Header

CM Eknath Shinde Group-BJP | राज्य सरकारच्या विविध समित्यांवरील नियुक्त्यांबाबत; शहर-जिल्हा भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांची झाली गुप्त बैठक

CM Eknath Shinde Group-BJP | राज्य सरकारच्या विविध समित्यांवरील नियुक्त्यांबाबत; शहर-जिल्हा भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांची झाली गुप्त बैठक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन CM Eknath Shinde Group-BJP | भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची नुकतेच गुप्त बैठक झाली. या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाली नाही मात्र राज्य सरकारच्या विविध महामंडळ आणि समित्यांवरील नियुक्त्यांबाबत या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (CM Eknath Shinde Group-BJP)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेतून फुटून निघालेल्या गटाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत राज्यामध्ये सत्ता स्थापन केली. या घटनेला चार महिने होत असून शिंदे गट आणि भाजपने आगामी राजकिय वाटचालीसाठी दिशा ठरविण्यास सुरूवात केली आहे. पुणे शहरामध्ये शिवसेनेला फारसे नुकसान झाले नसले तरी आजी माजी खासदार आणि आमदारांसह काही मोजक्या पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. (CM Eknath Shinde Group-BJP)

 

सत्ता संघर्षाचे नाट्य न्यायालयात असल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले सुरू आहेत. परंतू यानंतरही दोन्ही गटांकडून संघटन मजबुतीवर भर देण्यात आहे. पुणे जिल्ह्यात शिंदे गटाला फारशी ताकद मिळाली नसली तरी येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आगामी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अन्य पक्षातून प्रवेश घडवून आणले जाणार आहेत. यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपसोबत युती करतानाच उमेदवारांच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे.

 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार (MVA Government) बरखास्त झाल्यानंतर त्यांनी विविध महामंडळांवरील नियुक्त्या देखिल रद्द केल्या आहेत. ही महामंडळे आणि विविध समित्यांवर आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी यासाठी भाजप आणि शिंदे गटही सरसावला आहे. प्रामुख्याने शिंदे गटाकडून या समित्यांवरील नियुक्त्यांसाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याच अनुषंगाने शिंदे गटाचे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची नुकतेच डेक्कन परिसरातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली.
या बैठकीमध्ये समित्यांवरील नियुक्त्यांबाबत प्राथमिक चर्चा झाली.
याला दोन्ही गटांकडील प्रमुख पदाधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde Group-BJP | Regarding appointments to various committees of the State Government; A  secret meeting was held between city-district BJP and Shinde faction officials

 

हे देखील वाचा :

Kishori Pednekar | कोणाच्या कळा, कोणाचे बाळंतपण आणि कोणाच्या मांडीवर बाळ हे सर्वांना कळतं, किशोरी पेडणेकरांची राज ठाकरे आणि भाजपवर टीका

Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्यांना नाराज आमदारांना दिवाळीपूर्वी मिळणार महामंडळाचं गिफ्ट! प्रमुख मंत्र्यांची बैठक

State Anthem | सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा! महाराष्ट्राचे ‘राज्यगीत’ म्हणून ‘या’ प्रसिद्ध गीताची निवड

 

The post CM Eknath Shinde Group-BJP | राज्य सरकारच्या विविध समित्यांवरील नियुक्त्यांबाबत; शहर-जिल्हा भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांची झाली गुप्त बैठक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article