Header

Andhari by-Election | दिवाळीच्या तोंडावर चांगले वातावरण…कशाला उगाच…, भाजपाने माघार घेतल्याने टीका करणार्‍यांना अजित पवारांनी सुनावलं

Andhari by-Election | दिवाळीच्या तोंडावर चांगले वातावरण…कशाला उगाच…, भाजपाने माघार घेतल्याने टीका करणार्‍यांना अजित पवारांनी सुनावलं

पुणे : बहुजननामा ऑनलाइन राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आवाहनानंतर भाजपाने (BJP) काल बहुचर्चित अंधरी पोटनिवडणुकीतून (Andhari by-Election) माघार घेतली. यानंतर राजकीय वर्तुळासह सर्वत्र विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. पराभव स्पष्ट दिसू लागल्याने भाजपाने मनसेला (MNS) पुढे करून माघार घेतल्याची टीका (Andhari by-Election) होऊ लागली. तर एमसीए निवडणुकीसाठी (MCA Elections) मनसे, भाजपा, राष्ट्रवादीने (NCP) ही खेळी खेळल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut), प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही मनसे आणि भाजपावर टीका केली होती. या टीकेनंतर आज अजित पवारांची (Ajit Pawar) यावर प्रतिक्रिया विचारली असता स्पष्ट शब्दात त्यांनी उत्तर दिले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अजित पवार म्हणाले, काल एक चांगला निर्णय झाला. रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरीमधील पोटनिवडणुकीत (Andhari by-Election) ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उमेदवारी दिली होती. शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. तसेच राज ठाकरेंनी पत्र लिहिले होते. भाजपाने त्यासंबंधी सकारात्म भूमिका घेतली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. कारण महाराष्ट्रात जर असे पायंडे पडले तर ते चांगले आहे.

 

पवार पुढे म्हणाले, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सामंजस्याची भूमिका घेतली होती.
संपूर्ण महाराष्ट्राने ते पाहिले होते. यानिमित्ताने दिवाळीच्या तोंडावर चांगले वातावरण निर्माण झाले आहे.

 

ते म्हणाले, पण यावर काहीजण टीका करत आहेत. आता चांगले झाल्यावर कशाला टीका करायची.
शब्दाने शब्द वाढत जातो. चांगल्याला चांगले म्हटले पाहिजे, असे माझे सर्वच राजकीय पक्षांना आवाहन आहे.
वेगळा अर्थ काढून उगाच कोणाला तरी डिवचण्याचा, उचकवण्याचा प्रयत्न करु नये.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Andhari by-Election | ncp ajit pawar on bjp andheri by poll election shivsena rutuja latke muraji patel

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | संजय राऊत यांना जामीन नाहीच; सुनावणी पुढे ढकलली

State Government Employees | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, दिवाळीपूर्वीच मिळणार महिन्याचा संपूर्ण पगार

CM Eknath Shinde | एकदम ओके! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजू शेट्टी एकाच फ्लेक्सवर

 

The post Andhari by-Election | दिवाळीच्या तोंडावर चांगले वातावरण…कशाला उगाच…, भाजपाने माघार घेतल्याने टीका करणार्‍यांना अजित पवारांनी सुनावलं appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article