Header

CM Eknath Shinde | ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे-फडणवीसांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले – ‘चित्रपट तर मुख्यमंत्री आल्यावर सुरू होतो, मी फक्त…’

CM Eknath Shinde | ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे-फडणवीसांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले – ‘चित्रपट तर मुख्यमंत्री आल्यावर सुरू होतो, मी फक्त…’

ठाणे : बहुजननामा ऑनलाइन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल ठाण्यात एकाच कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात केलेल्या जोरदार फटकेबाजीला उपस्थितांनी हशा आणि टाळ्यांनी दाद दिली. ठाण्यात काल ऑल इंडिया बंजारा सेवा संघाने (All India Banjara Seva Sangh) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याला बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी फक्त ट्रेलर म्हणून काम करतो, मुख्यमंत्री आल्यावर चित्रपट सुरू होतो. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी दिलेला शब्द पूर्ण करणारा व्यक्ती असल्यानेच आज माझ्या मागे 50 आमदारांची ताकद उभी राहू शकली. शिंदे पुढे म्हणाले की, आज एका मोठ्या ताकदीच्या रूपात ठाण्यात बंजारा समाज एकत्र आलेला आहे. जंगल आणि निसर्ग संपदेत राहणारा हा समाज आपल्या राज्याचे भूषण आणि वैभव आहे.

 

बंजारा समाजाचे कौतुक करताना मुख्यमंत्री (CM Eknath Shinde)  म्हणाले, या समाजाने राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. या समाजातील व्यक्तींनी राज्याच्या विकासाला चालना दिली. जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्याने हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. शिक्षण आरोग्य या सेवेपासून वंचित राहिलेला हा समाज आहे. आता कुठेही हा समाज मागे राहणार नाही. कारण तुमचे सरकार राज्यात आले आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, बंजारा समाजाने नेहमीच आपल्या गाण्याने आणि नृत्याने आपले वेगळेपण जपले आहे.
या समाजावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचेही विशेष प्रेम आहे.
जुने पूर्वीचे बंजारा समाजाचे लमा मार्ग होते, त्या मार्गांवरून आज राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत.
गावा खेड्यात ज्या काही विहिरी आज दिसून येतात, ती बंजारा समाजाचीच देण आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | bjp devendra fadanvis and cm eknath shinde speech in thane program

 

हे देखील वाचा :

Nana Patole | अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याला एमसीएच्या (MCA) निवडणुकीचा वास येतो, नाना पटोलेंचा आरोप

Sushma Andhare | शिवसेना-वंचित संभाव्य युतीच्या आधीच नेत्यांमध्ये टीका-टिपण्णी, सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार, म्हणाल्या – मी काय फडणवीस किंवा…

Andheri By Election | अंधेरीत शिवसेनेचा विजय सोपा, अखेर भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे

 

The post CM Eknath Shinde | ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे-फडणवीसांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले – ‘चित्रपट तर मुख्यमंत्री आल्यावर सुरू होतो, मी फक्त…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article