Header

CM Eknath Shinde | ‘…तेव्हा कळेल’, संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

CM Eknath Shinde | ‘…तेव्हा कळेल’, संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East by-Election) भाजपने अचानक माघार घेतल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना मोठे बळ मिळाले. भाजपच्या मुरजी पटेल (BJP Murji Patel) यांनी माघार घेतली असली तरी सात उमेदवार रिंगणात असल्याने 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपच्या माघारीनंतर विरोधकांकडून टीका होत आहे. या टीकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेलाही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सोमवारी भाजपने उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) यांनीही मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची परंपरा कायम राखण्याचं काम भाजपने केले आहे. असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यावरही त्यांनी एका वाक्यात पलटवार केला. मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Election) जवळच आली आहे, तेव्हा कोण हरतो आणि कोण जिंकतो ते कळेल, असे शिंदे म्हणाले.

 

काय म्हणाले संजय राऊत?

 

संजय राऊत यांनी भाजप आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली होती.
मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) त्यांना हजर करण्यात आले होते.
त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, भाजपला राज ठाकरेंनी लिहलेलं पत्र हा ‘स्क्रिप्ट’चा भाग होता.
तर शिवसेना अंधेरीची पोटनिवडणूक 45 हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होती.
भाजपने या मतदारसंघात सर्वे केला होता. पराभवाची चाहूल लागत्यामुळे भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला,
अशी टीका संजय राऊत यांनी केली.

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | then you will know chief minister eknath shindes response to sanjay rauts criticism on andheri byelection

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तडीपार गुंड, प्रदीप बाजीराव जगताप विरुद्ध कारवाई

Satara Crime | रक्षकच बनला भक्षक… महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिसावर ‘पॉक्सो’ अंतर्गत FIR

Pune Crime | खून करुन अपघात झाल्याचा केला बनाव; उत्तमनगर पोलिसांनी केले ७ जणांना अटक

 

The post CM Eknath Shinde | ‘…तेव्हा कळेल’, संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article