Header

CM Eknath Shinde | ‘मी सर्वांनाच कामाला लावले, काही लोक शेतकऱ्यांच्या बांधावर…’ – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

CM Eknath Shinde | ‘मी सर्वांनाच कामाला लावले, काही लोक शेतकऱ्यांच्या बांधावर…’ – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत दुश्मनी ओढवून घेतली आणि बंड केले. त्यानंतर शिवसेनेचे निवडणूक आयोगाने दोन भागात विभाजन केले आहे. एक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा गट (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) आणि दुसरा शिंदेंचा गट (बाळासाहेबांची शिवसेना – Balasahebanchi Shivsena). या दोन गटांत आणि त्यांच्या नेत्यांमध्ये सतत शाब्दिक युद्ध सुरु असते. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) बोलण्याची संधी साधत उद्धव ठाकरेंना टोला लावला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मुख्यमंत्री नंदुरबार जिल्ह्यात नगरपरिषद इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास गेले होते. यावेळी त्यांच्या हस्ते या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ठाकरे यांच्यावर त्यांनी बाण सोडला. मुख्यमंत्री म्हणाले, मी सर्वांनाच कामाला लावले आहे. काही लोक शेतकऱ्यांच्या बांधावर जातात. आणखी कुठे कुठे जातात, त्यांनी गेले पाहिजे. शेवटी कामे तर केलीच पाहिजे. सरकारमध्ये असलेल्या आणि बाकी लोकांना सर्वांनाच मी कामाला लावले आहे, असे शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

 

तसेच राज्यातील विकासाची गती मंदावली होती. पण राज्यात आमचे सरकार स्थापन होताच विकासाला चालना
देण्याचे काम आम्ही केले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात आले
आहे. आम्ही सत्तेत येताच 72 मोठे निर्णय घेतले आणि 400 जीआर (शासकीय अध्यादेश) काढले आहेत.
त्यामुळे अनेकांची चिंता वाढली. आम्ही शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानले आहे.
आम्ही लघूदाब उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना प्रति युनिट 1 रुपया कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच स्थिर बिलात देखील 15 रुपये प्रतिमहा कमी करण्याचा निर्णय आम्ही आमच्या सरकारमध्ये घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

Web Title :-  CM Eknath Shinde | some people go to farm i put everyone to work chief minister eknath shinde

 

हे देखील वाचा :

Rohit Pawar | रोहित पवारांचे तानाजी सावंत आणि राम शिंदे यांना आव्हान

Solapur Crime | तरुणीने रचला कट, लॉजवर बोलवून तरुणाचे काढले अश्लील फोटो, मागितली खंडणी; पण…

Avadhoot Gupte | अवधूत गुप्ते भाजपच्या विद्यमान मंत्र्यावर चित्रपट काढणार

Tata Airbus | टाटा एअरबस प्रकल्पावरून सत्ताधार्‍यांचीच विरोधकांना धमकी, ‘या’ नेत्यांची नार्को टेस्ट करा, सर्व गुपिते समोर येतील

 

The post CM Eknath Shinde | ‘मी सर्वांनाच कामाला लावले, काही लोक शेतकऱ्यांच्या बांधावर…’ – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article