Header

Maharashtra Crime | भाऊबीजेला बहिणीकडे गेला अन्…

Maharashtra Crime | भाऊबीजेला बहिणीकडे गेला अन्…

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन भाऊबीज सणाला बहिणीकडे आलेल्या भावाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. (Maharashtra Crime) वालझिरी (ता. चाळीसगाव) येथे ही दुर्दैवी घटना घडली. राहुल सुरेश चौधरी Rahul Suresh Chowdhari (वय 17, रा. श्रीरामनगर, सिंधी कॉलनी, जामनेर रोड पाचोरा) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. (Maharashtra Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

भाऊबीज सणानिमित्त राहुल आपल्या बहिणीकडे (दि.27) वालझिरी येथे गेला होता. त्यावेळी तो वालझिरी (चाळीसगाव) येथे एका नवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाला. यावेळी बाजूला नदी असल्याने राहुल हात पाय धुण्यासाठी तेथे गेला. त्यावेळी तोल जाऊन तो नदीत पडला. नदी खोल असल्याने तो आत गेला. तसेच त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना तात्काळ त्याच्या नातेवाईकांना सांगितली. त्यावेळी ग्रामस्थांनी धाव घेत राहुलला पाण्याच्या बाहेर काढले. त्याला ताबडतोब चाळीसगावातील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital, Chalisgaon) नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. राहुलच्या पश्चात वृद्ध आई, बहीण आणि
मेहुणे असा परिवार आहे. राहुलची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. तसेच तो त्याच्या आईचा एकमेव आधार होता. त्यामुळे त्या माऊलीने आक्रोश केला आहे. राहुलच्या कुटुंबियांकडून मदतीची अपेक्षा केली जात आहे. राहुलच्या निधनाने त्याच्या आणि त्याच्या बहिणीच्या गावावर शोककळा पसरली आहे.

 

 

Web Title :-  Maharashtra Crime | unfortunate death of brother who went to sisters home for bhaubij at jalgaon

 

हे देखील वाचा :

Gulabrao Patil | कोणीही बिकाऊ नाही, राणांनी आपले शब्द मागे घेतले पाहिजेत – गुलाबराव पाटील

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खोकेवाले आमदार म्हणतात हे दु:ख, काही आमदारांनी मला फोन करून…’

Maharashtra Politics | ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा’; भाजपच्या आमदाराने केली मागणी

 

The post Maharashtra Crime | भाऊबीजेला बहिणीकडे गेला अन्… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article