Gulabrao Patil | ज्या दिवशी धनुष्यबाण आपल्याकडे येईल…, गुलाबराव पाटलांचा शिवसेनेला गंभीर इशारा
धुळे : बहुजननामा ऑनलाइन – मागील दोन महिन्यांपासून राज्यात दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) आमने-सामने आले आहेत. दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava 2022) राजकारण तापले आहे. येत्या बुधवारी शिवाजी पार्कवर (Shivaji Park) उद्धव ठाकरे गटाचा तर बीकेसी मैदानावर (BKC Ground) एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी धुळ्यात बोलताना शिवसेनेवर (Shivsena) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एक भाकित वर्तवताना शिवसेनेला इशारा दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा दोन्ही गटाने केला आहे. तसेच धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न केले जात असल्याने नेमकं कोणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धनुष्यबाणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचल्यानंतर न्यायालयाने याबाबत निवडणूक आयोगाला (Election Commission) निर्णय घेण्यास सांगितले आहे. यासंदर्भात आयोगासमोर सुनावणी झाल्यानंतर धनुष्यबाण दोन्ही पैकी एका गटाला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, आता यापुढे एक पाऊल जात धनुष्यबाण आपल्याकडे आल्यानंतर शिवसेनेतले अजून काही आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री (Water Supply Minister) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला आहे.
धुळ्यात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेनेत पाचही आमदार शिल्लक राहणार नाहीत.
मी लिहून देतो… ज्या दिवशी धनुष्यबाण आपल्याकडे येईल, 15 पैकी तिथे 5 आमदारही तिकडे दिसणार नाहीत.
ते फक्त धनुष्यबाण इकडे येण्याची वाट पाहात आहेत, असे पाटील यांनी म्हटले.
तसेच ज्याच्याकडे जास्त आमदार, खासदार आणि पक्षाचे जास्त लोक असतात, त्याला चिन्ह मिळतं.
आम्हाला खात्री आहे की, धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Gulabrao Patil | gulabrao patil mocks shivsena uddhav thackeray on dussehra melawa marathi news
हे देखील वाचा :
The post Gulabrao Patil | ज्या दिवशी धनुष्यबाण आपल्याकडे येईल…, गुलाबराव पाटलांचा शिवसेनेला गंभीर इशारा appeared first on बहुजननामा.