Header

Pune Crime | ‘हम यहा के भाई है’ ! धनकवडी-चव्हाणनगर परिसरात दहशत पसरविण्यासाठी तरुणावर तिघा गुंडाकडून कोयत्याने वार घावामुळे तुटले बोट

Pune Crime | ‘हम यहा के भाई है’ ! धनकवडी-चव्हाणनगर परिसरात दहशत पसरविण्यासाठी तरुणावर तिघा गुंडाकडून कोयत्याने वार घावामुळे तुटले बोट

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  – Pune Crime | काहीही कारण नसताना, ओळख नसताना तिघा गुंडांनी तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Kill). या मारहाण या तरुणाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचे शेजारील बोट तुटले आहे. याप्रकरणी शिवशंकर प्रभाकर थोरात (वय २७, रा. शिळीमकर चाळ, संभाजीनगर, धनकवडी – Sambhaji Nagar, Dhankawdi) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०८/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

त्यानुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याच गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीतील चव्हाणनगरमधील निर्मल पार्क येथील एच डी एफ सी बँकेच्या एटीएम सेंटरसमोर शनिवारी रात्री ९ वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी थोरात यांनी एटीएम सेंटरमधून पैसे काढून ते आपल्या दुचाकीवर
बसले असताना तिघे जण तेथे आले.
काहीही कारण नसताना, ओळख नसताना त्यांच्यातील एकाने थोरात यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला.
तेव्हा त्यांनी आपला हातमध्ये केला. त्याने दुसरा वार केला.
त्यात त्यांच्या बोटावर बसून बोट तुटले. मनगटावर वार केले.
ते खाली पडल्याने उठून उभे रहात असताना दुसर्‍या गुंडाने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली.
तिसर्‍या गुंडाने कोयत्याने त्यांच्या पाठीवर व कमरेवर पुन्हा वार करुन गंभीर जखमी केले.
ते पळून जात असताना त्यांनी हातातील कोयते वर करुन “हम यहा के भाई है, आम्ही तुला मारुन टाकू” असे म्हणून पळून जात आजू बाजूचे लोक घाबरुन इकडे तिकडे सैरावैरा पळु लागले.
पोलीस उपनिरीक्षक खंडाळे अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | ‘Hum ya ke bhai hai’! To spread terror in the Dhankawadi-Chavannagar area, a young man’s finger was broken due to a knife wound by three goons.

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हडपसरमधील रामटेकडी भागात टोळक्याची दहशत दोघांवर शस्त्राने वार

Chandni Chowk Flyover | चांदणी चौक पुल पाडण्याचे काम अंतिम टप्प्यात, परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कामाचा आढावा

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 5 लाखाचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त

 

The post Pune Crime | ‘हम यहा के भाई है’ ! धनकवडी-चव्हाणनगर परिसरात दहशत पसरविण्यासाठी तरुणावर तिघा गुंडाकडून कोयत्याने वार घावामुळे तुटले बोट appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article