Header

Maharashtra Politics | भाजपा खासदाराचा शिवसेनेला टोला, म्हणाले – ‘मुख्यमंत्री पद गेल्यानंतर महाराष्ट्राची…’

Maharashtra Politics | भाजपा खासदाराचा शिवसेनेला टोला, म्हणाले – ‘मुख्यमंत्री पद गेल्यानंतर महाराष्ट्राची…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Politics | सध्या महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा प्रश्न तीव्र झाला असून विरोधक ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena chief Uddhav Thackeray) यांनी मराठवाड्याचा दौरा करून शेतकर्‍यांच्या नुकसानीचा आढावा घेतला आणि धास्तावलेल्या बळीराजाला धीर दिला. आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नाशिकच्या दौर्‍यावर असून त्यांनीही शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. ठाकरेंच्या या दौर्‍याने सत्ताधार्‍यांची (Maharashtra Politics) अडचण झाली असून शेतकर्‍यांचा संताप वाढत आहे. यावरून भाजपा खासदार सुजय विखे पाटील (BJP MP Sujay Vikhe Patil) यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, ज्या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री होतो तो महाराष्ट्र दिसतो कसा हे पाहण्यासाठी ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहे. पद गेल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती पाहायला त्यांना वेळ मिळाला आहे. मात्र, मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरेंना निवांत वेळ दिला आहे.

 

सुजय विखे म्हणाले, ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा सुरु असते.
एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत करण्याबाबत बागायत, जिरायत क्षेत्रानुसार मदत देणे याबाबत चर्चा सुरु
आहे. हे सरकार शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेईल अशी मला खात्री आहे.

 

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री व्हावे, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते.
आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनीही सर्वांचीच तशी इच्छा असल्याचे म्हटले होते.
यावर, सुजय विखे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मुख्यमंत्री होईल ना होईल हा दुसरा भाग आहे.
परंतु त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल याचे नाव पहिले निश्चित करावे. राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार
(Shinde-Fadnavis Government) असून ते पुढील दहा ते पंधरा वर्षे हटणार नाही.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | bjp mp sujay vikhe patil criticized uddhav thackeray and aaditya thackeray over compensation of damage to farmer

 

हे देखील वाचा :

Naresh Mhaske | ‘ठाकरेंकडे जेव्हा सत्ता होती, तेव्हा शेतकऱ्यांसाठी काही केले नाही’ – नरेश मस्के

Chandrakant Patil | ‘मातोश्रीवर बसून लोकांची दु:खे कळत नाहीत’ – चंद्रकांत पाटील

Pune Crime | फटाका स्टॉलवरुन फटाके घेऊन जाऊन जीवे मारण्याची दिली धमकी; सराईत गुन्हेगारासह टोळक्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

 

The post Maharashtra Politics | भाजपा खासदाराचा शिवसेनेला टोला, म्हणाले – ‘मुख्यमंत्री पद गेल्यानंतर महाराष्ट्राची…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article