Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करुन घातला साडेतीन लाखांना गंडा
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून त्याने तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. गाडीचा हप्ता भरण्यासाठी साडेतीन लाख रुपये घेऊन ते परत करण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५९/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल आनंद मान Amol Anand Man (वय २९, रा. गुजराथ कॉलनी, कोथरुड) याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार २०१२ पासून आजपर्यंत सुरु होता. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे असून जवळ रहातात.
अमोल मान याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेळोवेळी खडकवासला, भुगाव येथील लॉजवर नेऊन
त्यांच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले. गाडीचे हप्ते भरण्यासाठी फिर्यादीकडून रोख व ऑनलाईन मिळून
३ लाख ५० हजार रुपये घेतले. फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने लग्नास नकार दिला.
तसेच पैसे देण्यासही नकार दिला. त्यामुळे आपली फसवणुक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यावर
त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक यादव (Sub-Inspector of Police Yadav) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | A young woman was tortured and extorted three and a half lakhs by luring her into marriage
हे देखील वाचा :
Anil Bonde | नाना पटोले कोणत्या आधारावर ही मागणी करत आहेत – खासदार अनिल बोंडे
MLA Eknath Khadse | बायकोला साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला, एकनाथ खडसेंचा शहाजीबापूंना टोला
The post Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करुन घातला साडेतीन लाखांना गंडा appeared first on बहुजननामा.