Pune Crime | चायनीज न मिळाल्याने टोळक्याची तरुणावर कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | ड्रॅगन चायनीजबरोबर (Dragon Chinese) वाद असल्याने दुसऱ्या ठिकाणी चायनीज खाण्यासाठी नेले. परंतु, ते बंद असल्याने टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी संतोष बाळू गायकवाड Santosh Balu Gaikwad (वय २८, रा. रायकरमळा, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४५४/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजन शहा ऊर्फ पांड्या (Rajan Shah alias Pandya), रोश पोकळे (Rosh Pokale), वैभव ऊर्फ गोट्या तरंगे (Vaibhav aka Gotya Tarenge), विक्या चव्हाण (Vicky Chavan) यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही घटना रायकर मळा येथील वृंदावन सोसायटीच्या लेनमध्ये बुधवारी पहाटे एक वाजता घडली. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपी हे मारुती मंदिरासमोरील ड्रॅगन चायनीजवाल्याशी नुडल्स देत नसल्याने भांडण करत होते.
मध्यरात्री हा प्रकार सुरु असल्याने फिर्यादी तेथे गेला.
त्याने आरोपींना सिल्व्हरबर्च हॉस्पिटल शेजारच्या चायनीजवाल्याकडे चला.
आपण नुडल्स खाऊयात, असे बोलून त्यांना घेऊन तो वृंदावन सोसायटीच्या गल्लीत आला.
परंतु, तेथील चायनीज बंद होते. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करुन “तुझ्यामुळे इकडे आलो.
हा चायनीजवाला बंद आहे. आता काय खाऊ. तो चायनीजवाला बंद केलेले असताना देखील काहीतरी करुन देत होता.
आता आम्ही उपाशी राहू का, तुला दाखवतोच आता” असे म्हणून त्यांनी फिर्यादीला हाताने मारहाण (Beating) केली. त्यांचे जवळील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करुन त्याला गंभीर जखमी केले. परिसरात दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर (Sub-Inspector of Police Nimbalkar) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | As the Chinese could not be found, the gang tried to kill the young man by stabbing him
हे देखील वाचा :
Eknath Khadse | शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांची अस्वस्थता बाहेर पडू लागली, एकनाथ खडसेंचा दावा
The post Pune Crime | चायनीज न मिळाल्याने टोळक्याची तरुणावर कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.