Header

Ashish Shelar On Aditya Thackeray | आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका, म्हणाले – ‘वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन आणि…’

Ashish Shelar On Aditya Thackeray | आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका, म्हणाले – ‘वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन आणि…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Ashish Shelar On Aditya Thackeray | वरळीच्या आमदारांना तर पेग, पेंग्वीन (Penguin) आणि पार्टी यापुढे काहीही दिसत नाही. आदित्य ठाकरे यांनी आजपर्यंत वरळीत मराठी साहित्य, खेळ, लोककला याचा एकही कार्यक्रम आयोजित केलेला नाही. त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल बोलूच नये, अशी टीका भाजपा नेते (BJP Leader) आशिष शेलार यांनी केली आहे. दिवाळीनिमित्त मुंबईतील विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी शेलार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ‘दिवाळी पहाट’ (Diwali Pahat 2022) कार्यक्रमावरून त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले, वरळीच्या मैदानावर आम्ही अतिक्रमण केल्याचा आरोप होतो आहे. मात्र, यात अतिक्रमणाचा कोणताही संबंध नाही.

 

शेलार म्हणाले, मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्यांच्याशी आमची नाळ जुळली आहे. जे दुसर्‍यांवर जळत राहतात, ते आनंदाचे दिवे लावू शकत नाहीत. त्यामुळे दुसर्‍याच्या अपयशावर ते सतत बोलत असतात आणि वर्तमान पत्रातून लिहित असतात. ते मुंबईत दिवे लावण्याच्या प्रकाश उत्सवाच्या कार्यक्रमात कुठे दिसत नाहीत. (Ashish Shelar On Aditya Thackeray)

 

दादरच्या गौरी भिडे (Gauri Bhide) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपत्तीवरून
मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले, न्यायालयात असलेल्या प्रकरणावर मी भाष्य करणार नाही.
मात्र, ज्यांनी ही याचिका दाखल केली आहे, ते मराठी आहेत.
त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारल्याचे दिसून येते.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Ashish Shelar On Aditya Thackeray | ashish shelar critcized aditya thackeray on diwali pahat program

 

हे देखील वाचा :

MP Anil Bonde | …म्हणून राहुल गांधी आणि रावणामध्ये जास्त साम्य आहे, खा. अनिल बोंडे यांचं टीकास्त्र

Builder Paras Porwal Suicide | मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची 23 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

Ajit Pawar | ‘या’ कारणामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार गेले थेट बारामतीला

 

The post Ashish Shelar On Aditya Thackeray | आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका, म्हणाले – ‘वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन आणि…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article