Pune Crime | लोहगाव-पठारे वस्ती परिसरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, बाहेर मुलींबरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या आयटी इंजिनिअर पतीला अटक
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | विवाहित असतानाही बाहेर मुलींबरोबर अनैतिक संबंध (Immoral Relationship) ठेवून घरात
सातत्याने भांडणे करुन आय टी इंजिनिअर (IT Engineer) असलेला पती त्रास देत होता. या सततच्या भांडणामुळे होणार्या मानसिक त्रासाला कंटाळून
विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. विमानतळ पोलिसांनी (Pune Police) अशा बाहेरख्याली पतीला अटक (Arrest) केली आहे.
(Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विकास दामू शेळके Vikas Damu Shelke (वय ३०, रा. पठारे वस्ती, लोहगाव) असे या पतीचे नाव आहे. सारीका विकास शेळके Sarika Vikas Shelke (वय २७) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना पठारे वस्तीत रविवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी घडली.
याप्रकरणी तिचे वडिल शामराव रामचंद्र पाटील Shamrao Ramchandra Patil (वय ५५, रा. आळतुर, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police) फिर्याद (गु. रजि. नं. ४११/२२) दिली आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारीका आणि विकास यांचा ७ वर्षापूर्वी विवाह झाला होता.
विकास याचे बाहेर संबंध असल्याने तो सारीकाशी सतत भांडणे उकरुन काढत असे.
या त्रासाला कंटाळून सारीका हिने सुसाईड नोट लिहून पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांना सारीकाच्या अंगावरील कपड्यांमध्ये सुसाईड नोट मिळाली.
त्यात ‘तिने तुला बाहेर लफडी करायची असेल तर कर, तुला पोटातील बाळही नको होते,’ असे लिहिले आहे.
विमानतळ पोलिसांनी विकास शेळके याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक लहाने
(Assistant Police Inspector Lahane) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Wife commits suicide by hanging herself in Lohgaon-Pathare area, IT engineer husband arrested for having immoral relationship with girls outside
हे देखील वाचा :
Bachchu Kadu | ‘गुवाहाटीवरुन मला परत यायचे होते, पण…’ – बच्चू कडू यांनी मनातील खदखद केली व्यक्त
Raigad News | रायगडचा स्वरूप शेळके अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम; 99.70% गुण
Bachchu Kadu | ‘आम्ही राजकारणात तडजोडी केल्याची किंमत भोगत आहोत’ – बच्चू कडू
The post Pune Crime | लोहगाव-पठारे वस्ती परिसरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, बाहेर मुलींबरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या आयटी इंजिनिअर पतीला अटक appeared first on बहुजननामा.