Header

T20 World Cup 2022 | आर या पार ! दोन्ही संघांना विजय आवश्यक; ऑस्ट्रेलियापुढे आयर्लंडचे आव्हान

T20 World Cup 2022 | आर या पार ! दोन्ही संघांना विजय आवश्यक; ऑस्ट्रेलियापुढे आयर्लंडचे आव्हान

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था – T20 World Cup 2022 | आज गतविजेता ऑस्ट्रेलिया (Austrelia) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यात महत्वाचा सामना पार पडणार आहे. या स्पर्धेत आपले स्थान टिकवायचे असेल तर दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणे महत्वाचे असणार आहे. गट 1 मध्ये सहाही संघांनी आतापर्यंत तीन सामने खेळले असून न्यूझीलंडचा संघ पाच गुणांसह अग्रस्थानी आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानासाठी बरीच स्पर्धा आहे. इंग्लंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीनही संघांचे प्रत्येकी तीन गुण आहेत. त्यामुळे सोमवारच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड या दोन्ही संघांचे विजयासह रनरेटकडे देखील लक्ष (T20 World Cup 2022) असणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

ब्रिस्बेन (Brisbane) येथील अधिक उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर दोन्ही संघांच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी झुंजावे लागणार आहे. या सामन्यात आयर्लंडपेक्षा ऑस्ट्रेलिया वरचढ आहे. ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेत म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी दमदार पुनरागमन करत श्रीलंकेवर (Sri Lanka) मात केली. त्यांचा इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठणे थोडे आव्हानात्मक होणार आहे.

 

दुसरीकडे, आयर्लंडने प्राथमिक फेरीचा अडथळा पार करून ‘अव्वल 12’ फेरीत आपले स्थान पक्के केले.
यानंतर त्यांनी इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला; परंतु त्यांना या स्पर्धेत श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला,
तर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला.
तरीदेखील आयर्लंडला अजून उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.
आजच्या सामन्याच्या निकालावर पुढचे समीकरण ठरणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 1.30 वा.
सुरु होणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

Web Title :-  T20 World Cup 2022 | australia face ireland at the gabba in t20 world cup 2022

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | मुंबई महापालिकेच्या कारभाराची कॅग मार्फत चौकशी, कोरोनातील दोन वर्षातील कामाच्या तपासणीचे राज्य सरकारचे आदेश

Pune Crime | लोहगाव-पठारे वस्ती परिसरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, बाहेर मुलींबरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या आयटी इंजिनिअर पतीला अटक

Bachchu Kadu | ‘गुवाहाटीवरुन मला परत यायचे होते, पण…’ – बच्चू कडू यांनी मनातील खदखद केली व्यक्त

 

The post T20 World Cup 2022 | आर या पार ! दोन्ही संघांना विजय आवश्यक; ऑस्ट्रेलियापुढे आयर्लंडचे आव्हान appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article