Header

Shivsena | धनुष्यबाण कुणाला मिळणार सेना की शिंदे गट? निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिली ही डेडलाईन

Shivsena | धनुष्यबाण कुणाला मिळणार सेना की शिंदे गट? निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिली ही डेडलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- Shivsena | धनुष्यबाण चिन्हावरून (Dhanushaban Symbol) शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेनेतील (Shivsena) वाद सध्या निवडणूक आयोगासमोर (Election Commission) आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) घटनापीठाने या वादावर कार्यवाही करण्यासाठी परवानगी दिली होती. आता निवडणूक आयोगाने शिवसेनेला (Shivsena) आपले म्हणणे मांडण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंतची वेळ दिली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

27 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीत शिवसेनेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी कोर्टाने निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा केला होता. शिवसेनेने (Shivsena) 23 सप्टेंबरला आपले म्हणणे मांडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितली होती. निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपले म्हणणे मांडण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंतची वेळ दिली आहे. शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत ठाकरे गट (Thackeray Group) कोणती कागदपत्रे सादर करणार त्यावर 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोग काय भूमिका घेणार यावर शिवसेना आणि शिंदे गटाचे पुढील राजकीय भवितव्य ठरणार आहे.

 

मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक (Andheri Assembly By-Election) शिंदे गटाने सुद्धा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने येथे शिंदे गट विरूद्ध शिवसेना असा सामना होणार आहे. या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचा निर्णय आला तर धनुष्यबाण चिन्हावर कोण लढणार हे पहायला मिळेल. दरम्यान, या पोटनिवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोग निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

शिवसेनेचे आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने (BJP) उमेदवार देण्याची घोषणा केली आहे.
शिंदे गटाने आधीच याला पाठिंबा दिला आहे.
पण अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव गटाला अडचणीत आणण्याची शिंदे गटाची रणनीती आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला न्यायालयीन दणका देण्यासाठी शिंदे गटाकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
धनुष्यबाण चिन्ह मिळू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट न्यायालयीन लढाई लढणार आहे.
न्यायालयीन लढाईत शिंदे गटाकडून देखील धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आणि
ठाकरे गटासमोर पेच निर्माण करण्यासाठी ही चाल खेळली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

 

 

Web Title :- Shivsena | the election commission has given shivsena time till october 7

 

हे देखील वाचा :

Pune Crime | महिलांच्या लैंगिक छळवणूक प्रकरणात Coca-Cola कंपनीने घेतलेला ‘तो’ निर्णय औद्योगिक न्यायालयाकडून कायम, याचिकाकर्त्याचा अर्ज फेटाळला

Shahaji Bapu Patil | अजित पवारांना वाटतं आपण पुन्हा पहाटे शपथ घेऊ पण…, अजित पवारांना शहाजी बापू पाटलांचा टोला

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस सरकार गोरगरीबांची दिवाळी गोड करणार, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला मोठा निर्णय

 

The post Shivsena | धनुष्यबाण कुणाला मिळणार सेना की शिंदे गट? निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिली ही डेडलाईन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article