Mumbai Accident News | वरळी सी लिंकवर भीषण अपघात, ५ जण जागीच ठार, १० जखमी
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai Accident News | वांद्रे -वरळी सी लिंकवर (Bandra-Worli Sea Link) पहाटे भरधाव जाणारी वाहने एकामेकांवर आदळून भीषण अपघात झाला असून त्यात ५ जणांचा जागीच मृत्यु (Death) झाला. किमान १० जण जखमी झाले असून त्यांच्या तिघांची प्रकृती गंभीर आहे. (Mumbai Accident News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वांद्रे वरळी सी लिंक पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. सी लिंकवर चार कार व एक रुग्णवाहिका (Ambulance) एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला आहे. सुरुवातीला दोन कारचा अपघात झाला होता. त्यातील जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका आली होती. जखमींना रुग्णवाहिकेत ठेवत असताना इतर गाड्या वेगाने आल्या व त्या धडकल्या. या भीषण अपघातात चार कारचा चक्काचूर झाला असून काही कारमधील एअर बॅग्जही उघडल्याचे दिसून येत आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
Web Title :- Mumbai Accident News | Horrific accident on Worli Sea Link, 5 killed on the spot, 10 injured
हे देखील वाचा :
The post Mumbai Accident News | वरळी सी लिंकवर भीषण अपघात, ५ जण जागीच ठार, १० जखमी appeared first on बहुजननामा.