Header

Sushma Andhare | राजभाऊ, भाजपा तुमचं ऐकत असेल तर एवढी दोन पत्र लिहाच! सुषमा अंधारेंची राज ठाकरेंना विनंती, मांडले हे 2 मुद्दे

Sushma Andhare | राजभाऊ, भाजपा तुमचं ऐकत असेल तर एवढी दोन पत्र लिहाच! सुषमा अंधारेंची राज ठाकरेंना विनंती, मांडले हे 2 मुद्दे

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन मनसे प्रमुख राज ठाकरे (NCP Chief  Sharad Pawar)  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief  Sharad Pawar) यांच्या आवाहनानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून (Andheri By-Election) भाजपाने माघार घेतली आहे. अचानक घडलेल्या या घोडीमोडीकडे संशयाने पाहिले जात आहे.  तर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरे यांना खोचक विनंती करताना म्हटले आहे की, राजभाऊ, भाजपा (BJP) तुमचं ऐकत असेल तर एवढी दोन पत्रं लिहाच!. दरम्यान, भाजपचा आणि संवेदनशीलतेचा काहीही संबंध नसून त्यांनी केवळ पराभवाच्या भितीने माघार घेतली असल्याचा टोला सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपला लगावला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरे यांना विनंती करण्यासाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडून झालेला महाराष्ट्राचा अवमान आणि वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) या दोन मुद्यावर अंधारे यांनी भाष्य केले आहे. व्हिडिओत अंधारे यांनी म्हटले आहे की, भाजपाने राज ठाकरेंच्या पत्राचे कारण पुढे केले.

 

परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने हे सांगितले पाहिजे की खरेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्राचा
परिणाम भाजपावर होत असेल किंवा भाजपा त्यांचे ऐकत असल्यास माझी विनंती आहे राज ठाकरेंना.
राजभाऊ तुम्ही एक पत्र लिहा भाजपाला.
ते पत्र असे लिहा की महामहीम राज्यपाल पदाच्या खुर्चीवर बसणारे कोश्यारीजी जर वारंवार महाराष्ट्राचा अवमान
करत असतील तर असे राज्यपाल कथित महाशक्तीने परत बोलावले पाहिजेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दुसर्‍या पत्राची विनंती करताना अंधारे यांनी राज ठाकरे यांना म्हटले आहे की, महाराष्ट्रातील फॉक्सकॉन वेदांता
हा महत्त्वकांशी प्रकल्प जो गुजरातला गेलाय तो परत येण्या संदर्भात पत्र लिहा.

 

Web Title :- Sushma Andhare | sushma andhare says raj thackeray should write letter to bjp over governor and vedanta foxcon issue

 

हे देखील वाचा :

Pune Rain | पुणे बुडाले पावसात; पावसामुळे शहरात हाहाकार, अनेक घरात शिरले पाणी, रेल्वे स्टेशनही बुडाले
Andheri By-Election | …ही तर फिक्स मॅच, डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीनेच भाजपाची माघार, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदींची राज ठाकरे यांच्यावरही टीका

Pune Crime | कोंढव्यात 9 लाखांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा गुन्हे शाखेकडून जप्त

 

The post Sushma Andhare | राजभाऊ, भाजपा तुमचं ऐकत असेल तर एवढी दोन पत्र लिहाच! सुषमा अंधारेंची राज ठाकरेंना विनंती, मांडले हे 2 मुद्दे appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article