Header

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘मी विचारलेले प्रश्न…’

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘मी विचारलेले प्रश्न…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर थोड्याच दिवसात वेदांता फॉक्सकॉनचा एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. त्यानंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले. पहिल्यांदा महाविकास आघाडीने शिंदे फडणवीस सरकारवर महाराष्ट्राच्या हातातील प्रकल्प गुजरातच्या ताटात ठेवण्याचा आरोप केला. यावर शिंदे फडणवीस सरकारने वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातून गेल्याचा आरोप केला. त्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) २९ नोव्हेंबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन एक पत्र पुरावा म्हणून सादर करत शिंदे सरकारच्या काळात प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याचा दावा केला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने पुरावा नाकारला आहे. त्यानंतर आज पुन्हा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “एका माणसाच्या (एकनाथ शिंदे) राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय. उद्योग मंत्री असून सुद्धा उदय सामंत यांना काम करताना मी कधीच पाहिलेलं नाही. या संपूर्ण प्रोसेसमधून राज्य सरकारने त्यांना बाहेर ठेवलेलं आहे. ज्यांचा या खात्याशी काहीही संबंध नाही ते का उत्तर देत आहेत. मी विचारलेले प्रश्न घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे. त्यांनी मंचावर बसावं आणि माझ्याबरोबर मीडियासमोर डिबेट (वाद-विवाद) करावी.”

 

आगामी हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी आज (३० नोव्हेंबर)
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आदित्य ठाकरे सहभागी होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार
हल्ला चढवला. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माध्यमांसमोर त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचे
आव्हान दिले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नसली तरी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे
गटातील नेत्यांनी त्यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Aditya Thackeray | maharashtra is falling behind because of one mans monstrous ambition aaditya thackeray attacked cm eknath shide maharashtra politics

 

हे देखील वाचा :

Neena Gupta | नीना गुप्तांचा वर्कआउट व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी केले कौतुक

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पहिला विजय

Shruti Haasan | आजारपणातील फोटो शेअर करत अभिनेत्री श्रुती हसन म्हणाली – ‘हा लुक देखील… ‘

BJP Leader Chandrashekhar Bawankule | राज्यपालांच्या बदलीबद्दल भाजपकडे एकच प्रतिक्रिया? चंद्रकांत बावनकुळेंनी दिले देवेंद्र फडणवीसांसारखे उत्तर

 

The post Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘मी विचारलेले प्रश्न…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article