Header

Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाडने आसामच्या गोलंदाजांचा घेतला समाचार; विजय हजारे ट्रॉफीत सलग दुसऱ्या शतकाची नोंद

Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाडने आसामच्या गोलंदाजांचा घेतला समाचार; विजय हजारे ट्रॉफीत सलग दुसऱ्या शतकाची नोंद

बहुजननामा ऑनलाईन – ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) जबरदस्त कामगिरी केली आहे. विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये ऋतुराजने 9 इनिंग्जमध्ये 6 शतकं व 1 द्विशतक झळकावले आहे. येथे सुरू असलेल्या आसामविरुद्धच्या आजच्या सामन्यातही ऋतुराजने शतक झळकावले. हे त्याचे या स्पर्धेतील सलग दुसरे शतक ठरले. त्याने या सामन्यात आसामच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

प्रथम फलंदाजीला आलेल्या महाराष्ट्राला दुसऱ्याच षटकात राहुल त्रिपाठी (3) याच्या रूपाने धक्का बसला. त्यानंतर ऋतुराज व एस बछाव यांनी संघाचा डाव सावरला. बछाव 52 चेंडूंत 41 धावांवर माघरी परतल्यानंतर ऋतुराजने अंकित बावणेच्या मदतीने संघाचा डाव पुढे नेला. ऋतुराजने 88 चेंडूंत शतक पूर्ण केले. आजही तो द्विशतक झळकावेल असे वाटत असताना रियान परागने त्याची विकेट घेतली आणि खेळी संपुष्टात आली. ऋतुराजने आपल्या खेळीमध्ये 126 चेंडूंत 168 धावा केल्या. यामध्ये 18 चौकार व 6 षटकारांचा समावेश होता.

 

ऋतुराज गायकवाडची विजय हजारे ट्रॉफीतील कामगिरी

136(112)
154*(143)
124(129)
21(18)
168(132)
124*(123)
40(42)
220*(159) in Quarter-final
168(126) in Semi-final

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Ruturaj Gaikwad | maharashtra vs assam ruturaj gaikwad scored 168 runs in 126 balls with 18×4 6×6 his 6 hundreds 1 double hundred in just 9 innings

 

हे देखील वाचा :

Pune News | साताराकडून पुण्याकडे येणारी वाहतूक नवीन कात्रजबोगद्यातून दरीपूलमार्गे

Nagnath Kottapalle Passes Away | ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन

Pune Crime | पोलिसांविरुद्ध सोशल मीडियावर अश्लील मजकूर, 9 जणांवर एफआयआर

 

The post Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाडने आसामच्या गोलंदाजांचा घेतला समाचार; विजय हजारे ट्रॉफीत सलग दुसऱ्या शतकाची नोंद appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article