Header

Anupam Kher | काश्मीर फाइल्सवर झालेल्या टीकेनंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत दिले ‘हे’ प्रतिउत्तर

Anupam Kher | काश्मीर फाइल्सवर झालेल्या टीकेनंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत दिले ‘हे’ प्रतिउत्तर

बहुजननामा ऑनलाईन – Anupam Kher | ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाने प्रेक्षकांना हादरवून टाकले होते. एवढेच नाही तर या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणारा सिनेमा म्हणून ओळख निर्माण झाली होती. मात्र गोव्यात रंगलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलची सांगता या चित्रपटाच्या वादामुळे चर्चेत ठरली आहे. ज्यूरी हेड आणि इस्रायली सिनेमाचे निर्माते नादव लॅपिड यांनी या चित्रपटाबद्दल व्यक्त केलेले मनोगत सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या सिनेमावर नादव लॅपिडनी केलेल्या टीकेने सर्वांचेच लक्ष वेधले आहेत. कश्मीर फाईल्स हा सिनेमा प्रोपगंडा आणि वल्गर असल्याची टीका ज्युरी हेड नादव लॅपिडनी यांनी केली होती. तर आता या त्यांच्या टीकेवर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी संताप व्यक्त केला आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करत याचे उत्तर देखील दिले आहे. (Anupam Kher)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सध्या सोशल मीडियावर नादव लॅपिड यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे अनेक जण या व्हिडिओवर आपले मत मांडत आहेत. अभिनेते अनुपम खेर यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. यांनी देखील या टीकेनंतर गप्प न राहता सडेतोड उत्तर दिले आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करत म्हटले की, “असत्याची उंची कितीही मोठी असली तरीही सत्याच्या तुलनेमध्ये ती छोटीच असते” आणि या ट्वीटसह त्यांनी कश्मीर फाइल्स मधला स्वतःचा फोटो आणि तिथल्या काही परिस्थितींचे जुने फोटो ही शेअर केले आहे. सध्या अनुपम खेर यांचे हे ट्विट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या ट्विटवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. (Anupam Kher)

 

 

एवढेच नाही तर अनुपम खेर यांच्या सह निर्माते अशोक पंडित यांनीही याबाबत भाष्य करत ट्विट केले आहे. अशोक पंडित म्हणाले “माहिती आणि प्रसार मंत्रालयाने नादव लॅपिड यांना इफ्फीच्या मुख्य ज्यूरीच्या पदावर बसवणं हीच मोठी चूक होती यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे” असे त्यांनी आपल्या ट्विट च्या माध्यमातून म्हटले आहे.

 

 

तर इफ्फी महोत्सवात जुरी हेड नादव लॅपिड म्हणाले होते की, “महोत्सवातील 15 सिनेमा त्यामध्ये
द कश्मीर फाइल्स हा देखील सिनेमा होता. मात्र हा सिनेमा पाहिल्यावर आम्हाला धक्का बसला,
आम्ही सगळे अस्वस्थ झालो. आमच्या दृष्टीने हा सिनेमा एक विशिष्ट प्रोपगंडा आणि वल्गर आहे.
इफ्फी सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात कश्मीर फाईल सारख्या सिनेमाला स्थान मिळणे हे अयोग्य आहे”.
आता नादव लॅपिड यांचा हा व्हिडिओ शेअर होत असताना कश्मीर फाईल च्या या नव्या वादा नंतर
कश्मीर फाईल्स ट्विटरवर ट्रेडिंग मध्ये आहे. तर अनेकजण यावर टीका करतायेत तर कोणी याला सपोर्ट देखील
करत असल्याचे दिसत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Anupam Kher | anupam kher reaction on the kashmir files iffi jury head nadav lapid statement

 

हे देखील वाचा :

Covid-19 Death | कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूला केंद्र सरकार जबाबदार नाही

MP Sanjay Raut | सीमाप्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत का?, संजय राऊतांचा खोचक सवाल

Yami Gautam | यामी गौतमचा ‘लॉस्ट’ हा चित्रपट ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

 

The post Anupam Kher | काश्मीर फाइल्सवर झालेल्या टीकेनंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत दिले ‘हे’ प्रतिउत्तर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article