Header

Pune Rickshaw Strike | ‘बोल बच्चन अधिकारी’ म्हणत संतप्त रिक्षा चालकांचे RTO अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत

Pune Rickshaw Strike | ‘बोल बच्चन अधिकारी’ म्हणत संतप्त रिक्षा चालकांचे RTO अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात सुरू झालेल्या बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा चालकांनी काल संप (Pune Rickshaw Strike) केला होता. वारंवार निवेदन देऊनही आरटीओ अधिकारी रिक्षा चालकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रिक्षाचालक संघटनांनी केला आहे. त्यानंतर या बेकायदा दुचाकी रिक्षांच्या विरोधात ‘बघतोय रिक्षावाला संघटने’ने बंद (Pune Rickshaw Strike) पुकारला. या बंदाला इतर सर्व रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिला होता.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सोमवारी 28 नोव्हेंबर रोजी मोठ्या संख्येने रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान पुणे आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांना भेटण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांनी शिंदे यांची त्यांच्या समोर, त्यांच्या कार्यालयात ‘फेकू अधिकारी’ म्हणत साष्टांग दंडवत घातला. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत रिक्षाचालक अजित शिंदेंना म्हणतात, “तुमच्या प्रत्येक वेळीच्या फेकूगिरीला, बोलबच्चनगिरीला आम्ही कंटाळलो आहोत. मागील वेळेसही तुम्ही हेच आश्वासन आम्हाला दिले होते, परंतु तुम्ही ते पाळले नाही. तुमच्यासारखा फेकू अधिकारी पुणे जिल्ह्याला लाभला, तुमच्यासारख्या फेकू अधिकाऱ्यांसह प्रशासनाचा धिक्कार करतो.” असे म्हणत रिक्षाचालकांनी पुणे आरटीओ अजित शिंदे यांना साष्टांग दंडवत घातला.

 

रिक्षाचालकांशी चर्चेदरम्यान आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांनी बेकायदा दुचाकी टॅक्सी विरोधात कारवाई केली
जाईल, त्यासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमले जातील, कारवाईसाठी आवश्यक असणारे सहकार्य पोलिसांनाही केले जाईल,
असे सांगितले होते.
पण, मागील अनेक महिन्यांपासून रिक्षाचालकांना हेच आश्वासन अजित शिंदे देत असल्याने त्यांच्या या
आश्वासनामुळे रिक्षाचालक संतप्त झाले होते. दरम्यान, रिक्षाचालक आणि आरटीओ यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी पुढाकार घेतला होता.
‘बघतोय रिक्षावाला संघटने’चे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर, काही रिक्षा चालक आणि आरटीओचे अधिकारी यांच्यात रिक्षा चालकांच्या मागण्या वर चर्चा सुरू होती.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दरम्यान, पिंपरी चिंचवड आणि पुण्यात करण्यात आलेला रिक्षाचालकांचा संप सोमवारी संध्याकाळी मागे
घेण्यात आला. बेकायदा दुचाकी टॅक्सीवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
स्थापन होणार असल्याचे आश्वासन हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिले.
त्यानंतर रिक्षा चालकांनी आपला संप (Pune Rickshaw Strike) मागे घेतला.
पण, जर येत्या दहा दिवसात बेकायदा दुचाकी टॅक्सी चालकांवर कारवाई झाली नाही
तर, पुन्हा आंदोलन करू असा इशाराही यावेळी रिक्षा संघटनांनी दिला आहे.

 

 

Web Title :- Pune Rickshaw Strike | pune video rto officer ajit shinde was trolled by auto drivers saying he is telling lies

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police Recruitment | राज्य सरकारची मोठी घोषणा, पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

Pune-Mahavitaran | महापारेषणकडून पूर्वनियोजित दुरुस्ती कामे; शिवाजीनगर, डेक्कन परिसरात ‘या’ दोन दिवशी वीजपुरवठा बंद राहणार

MNS Chief Raj Thackeray | आम्ही फक्त प्रश्न सोडवायला असतो, आम्हाला कोणी मते देत नाही – राज ठाकरे

 

The post Pune Rickshaw Strike | ‘बोल बच्चन अधिकारी’ म्हणत संतप्त रिक्षा चालकांचे RTO अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article