Header

Balasaheb Thackeray Memorial | “…ती मागणी वैयक्तिक, पक्षाची अशी भूमिका नाही”; स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबद्दल देवेंद्र फडणवीस उत्तरले

Balasaheb Thackeray Memorial | “…ती मागणी वैयक्तिक, पक्षाची अशी भूमिका नाही”; स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबद्दल देवेंद्र फडणवीस उत्तरले

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आज स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Memorial) यांचा स्मृतीदिन आहे. स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी एक मोठी मागणी केली आहे. बाळासाहेबांच स्मृतीस्थळ (Balasaheb Thackeray Memorial) सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीमुळे ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट-भाजपा (Eknath Shinde Group BJP) पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. दरम्यान, त्यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाष्य केलं आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रसाद लाड यांच्या मागणीबद्दल बोलताना ते म्हणाले, “आमच्या पक्षाची अशी कोणतीही मागणी नाही. वैयक्तिक दृष्ट्या कोणालाही असं वाटत असेल. पण भाजपाने अशी कोणतीही मागणी केलेली नाही. बाळासाहेबांचे स्मारक जनतेचं असून, जनतेचं राहणार आहे. या स्मारकाचा वापर खासगी बैठकांसाठी होऊ नये ,अशी सर्वांचीच आशा आहे. एखादं राष्ट्रीय स्मारक उभं राहिल्यानंतर काही नियम असतात, त्यांचं पालन होईल अशी अपेक्षा आहे.”

 

“हे स्मारक कोणाचीही खासगी संपत्ती नाही. ते कोणत्याही एका कुटुंबाचं नाही. ते राज्य सरकारचं स्मारक आहे.
ती जमीन, त्यासाठी लागणारा निधी सरकारचा आहे. हे स्मारक राज्य सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे.
सन्मान म्हणून ठाकरे कुटुंबीयांपैकी एक किंवा दोन सदस्यांना या स्मारक समितीवर घ्यावं,
मात्र हे स्मारक महाराष्ट्र शासनाने आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे.” अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली होती.

 

 

Web Title :- Balasaheb Thackeray Memorial | bjp devendra fadnavis on prasad lad demands maharashtra government to take control of balasaheb thackeray memorial

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘अप्पर’ची पोर गुन्हेगार नावाने व्हिडिओ व्हायरल करणार्‍या ‘रॅपसिंगर’वर FIR

Sanjay Raut | सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या – संजय राऊत

Pune Crime | महिला पोलीस कर्मचार्‍याला अश्लिल शिवीगाळ करीत चप्पलने मारहाण

 

The post Balasaheb Thackeray Memorial | “…ती मागणी वैयक्तिक, पक्षाची अशी भूमिका नाही”; स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबद्दल देवेंद्र फडणवीस उत्तरले appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article