Header

Pune Minor Girl Rape Case | आई वडिलांना येरवडा जेलमध्ये सडविण्याची धमकी देऊन काकाचा १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

Pune Minor Girl Rape Case | आई वडिलांना येरवडा जेलमध्ये सडविण्याची धमकी देऊन काकाचा १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Minor Girl Rape Case | फसवणुकीच्या (Cheating Case) गुन्ह्यात अटक झालेल्या आई वडिलांना येरवडा कारागृहात (Yerwada Jail) भेटण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्या काकाने लॉजमध्ये नेऊन बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी एका १४ वर्षाच्या मुलीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २८१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहीत गौर Rohit Gaur (रा. कानपूर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ताडीवाला रोड येथील डिलक्स लॉजवर (Deluxe Lodge, Tadiwala Road) ६ जुलै २०२२ रोजी घडला. (Pune Minor Girl Rape Case)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिच्या आईवडिलांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
त्यात त्यांना ३० डिसेंबर २०२१ रोजी अटक (Arrest) करण्यात आली असून सध्या ते येरवडा कारागृहात आहेत.
फिर्यादी या त्यांना भेटण्यासाठी आपल्या मावस काकाबरोबर कानपूरहून आल्या होत्या. ते डिलक्स लॉजवर उतरले.
तेथे मावस काकाने त्याच्याजवळील बंद केलेले लॅपटॉप ठेवून देण्यासाठी फिर्यादींना जवळ बोलावले.
तिचा हात पकडून तिला बेडवर ढकलले.
तेव्हा फिर्यादी यांनी “चाचु तुम्ही काय करताय” अशी त्यांच्याकडे विचारणा केली.
तेव्हा त्याने “मी जे काही करीत आहे. ते मला करु दे, नाही तर मी तुझ्या मम्मी पप्पाची येरवडा जेलमधून बेल
होऊ देणार नाही. त्यांना येरवडा जेलमध्येच सडविन,” अशी धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
जवळ दुसरे कोणी नसल्याने तिला आपल्यावरील अत्याचाराची बाब कोणाला सांगता येईना.
त्यानंतर ते परत कानपूरला गेले. नुकतीच तिच्या आईवडिलांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर तिने आपल्यावरील अत्याचाराची माहिती आईला सांगितली. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव (Assistant Police Inspector Jadhav) तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Uncle molests 14-year-old girl by threatening to put her parents in Yerawada Jail

 

हे देखील वाचा :

Har Har Mahadev | हर हर महादेव चित्रपटावर बाजीप्रभू देशपांडेंच्या वशंजांची प्रतिक्रिया

Jitendra Awhad | “… मग त्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा का?”; जितेंद्र आव्हाड प्रकरणी छगन भुजबळांची सरकारवर टीका

Indrani Balan Foundation | इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतनी लोणी ग्रामस्थांना रुग्णवाहिका, उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते लोकर्पण

 

The post Pune Minor Girl Rape Case | आई वडिलांना येरवडा जेलमध्ये सडविण्याची धमकी देऊन काकाचा १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article