Header

FIR On Jagdish Patil Of Rapido Bike Taxi | रिक्षा चालकांच्या बेमुदत संपाच्या इशार्‍यानंतर आरटीओकडून रॅपिडोच्या जगदीश पाटीलवर गुन्हा

FIR On Jagdish Patil Of Rapido Bike Taxi | रिक्षा चालकांच्या बेमुदत संपाच्या इशार्‍यानंतर आरटीओकडून रॅपिडोच्या जगदीश पाटीलवर गुन्हा

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – FIR On Jagdish Patil Of Rapido Bike Taxi | गेली २ वर्षे बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सीचा व्यवसाय करीत असतानाही आरटीओ कार्यालय डोळ्यावर कातडे ओढून बसलं होतं. शेवटी रिक्षाचालकांनी बेमुदत बंदचा इशारा दिल्यानंतर आता आरटीओने रॅपिडोचे जगदीश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (FIR On Jagdish Patil Of Rapido Bike Taxi)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २८७/२२) दिली आहे. त्यानुसार रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस या कंपनीचे अधिकारी जगदीश पाटील (रा. सुयश प्लाझा, भांडारकर रोड) व अन्य अधिकार्‍यांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ पासून सुरु आहे. (FIR On Jagdish Patil Of Rapido Bike Taxi)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅपीडो कंपनीस महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाने अथवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी या संवर्गात आजपर्यंत कोणताही पवाना दिलेला नाही, असे असताना कंपनीने पुणे शहरासह राज्यभरात रॅपीडो हे बाईक टॅक्सी विनापरवानगी बेकायदेशीर ऑनलाईन अ‍ॅप सुरु केले. हे अ‍ॅप कायदेशीर असल्याचे दुचाकी वाहनचालकांना व प्रवाशांना भासवून त्यांच्याकडून बेकायदेशीर अ‍ॅपचे माध्यमातून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करवून घेतली. त्याचे मोबदल्यामध्ये कंपनीच्या अधिकार्‍यांनी आर्थिक फायदा करुन घेतला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या बेकायदेशीर बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकांचा व्यवसायावर गदा आली आहे.
त्यामुळे बघतोय रिक्षावाला संघटनेने त्याविरोधात आंदोलन हाती घेतले.
त्यानंतर आरटीओ ने कंपनीविरोधात कारवाई न करता जे दुचाकीचालक प्रवासी घेऊन जातात,
त्यांच्यावर कारवाई सुरु केली. त्यांच्या दुचाकी जप्त केल्या होत्या.
पण, मुळात कंपनीवर कोणतीही कारवाई केली जात नव्हती.
त्यामुळे रिक्षा संघटनांनी २८ नोव्हेबरपासून बेमुदत बंदची हाक दिली होती.
त्याला पुणे व पिंपरी चिंचवडमधील अनेक रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिला.
त्यामुळे कायदा सुव्यवस्थाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली.
त्यामुळे शेवटी नाईलाजाने आरटीओने कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे पहिले पाऊल उचलले आहे.
हे बाईक टॅक्सीचे हे अ‍ॅप बंद करण्याची रिक्षाचालकांची मागणी आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- FIR On Jagdish Patil Of Rapido Bike Taxi | RTO files case against Rapido’s Jagdish Patil after rickshaw pullers warn of indefinite strike

 

हे देखील वाचा :

Pune Crime | भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या युवकासह मित्रावर कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न

Deepak Kesarkar | ‘राज्यपालांबद्दलची भूमिका केंद्राला कळवली, पण जर भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर…’

Ranveer Singh | बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा बिग बॉस मराठी मधील ‘या’ स्पर्धकाला पाठिंबा; व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा

Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? शरद पवारांनी दिले उत्तर; म्हणाले – ‘मी काही ज्योतिषी नाही’

 

The post FIR On Jagdish Patil Of Rapido Bike Taxi | रिक्षा चालकांच्या बेमुदत संपाच्या इशार्‍यानंतर आरटीओकडून रॅपिडोच्या जगदीश पाटीलवर गुन्हा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article