Header

Ved Teaser | रितेश आणि जेनेलियाच्या नव्या चित्रपटाचा टीझर रिलीज; अभिनेता अक्षय कुमारच्या ट्विटने वेधले सगळ्यांचे लक्ष

Ved Teaser | रितेश आणि जेनेलियाच्या नव्या चित्रपटाचा टीझर रिलीज; अभिनेता अक्षय कुमारच्या ट्विटने वेधले सगळ्यांचे लक्ष

बहुजननामा ऑनलाईन –  Ved Teaser | अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आता रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवायला सज्ज झाला आहे. रितेशने नुकताच ‘वेड’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनिलिया देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून जेनेलियाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आता वेड चित्रपटातून जेनेलिया मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. वेड चित्रपटातून पुन्हा एकदा जेनेलिया आणि रितेश प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या वेड चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Ved Teaser)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नुकताच पाडव्याच्या शुभमुहूर्तावर रितेश देशमुख ने त्याच्या ‘वेड’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण केले होते. तेव्हापासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. तर या चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर आता चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाचा टिझर पाहून चाहते तर रितेशची वाहवा करत आहेत. तर बॉलीवूडचा अभिनेता खिलाडी अक्षय कुमारने देखील या मराठमोळ्या मित्राचे मराठमोळ्या शब्दात कौतुक करत ट्विट केले आहे. (Ved Teaser)

 

अक्षयने त्याच्या ट्विटरवर वेड चित्रपटाचा टिझर शेअर करत लिहिले आहे की,
“माझा भाऊ आणि अ‍ॅक्टर आता डिरेक्टर झालाय त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी सिनेमाचा टीझर पाहिला आणि खरंच सांगतो मला वेड लागलं तुम्ही पहा तुम्हालाही लागेल.
याआधी अक्षय कुमार आणि रितेश देशमुखला हाउसफुल या चित्रपटातून एकत्रित पाहिले होते.
या जोडीने या चित्रपटात खूप धुमाकूळ घातला होता.
त्यानंतर हाउसफुलच्या सिक्वेललाही प्रेक्षकांनी तितकीच पसंती दिली होती.
आता पुढच्या सिक्वेलमध्ये देखील अक्षय आणि रितेश प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर आता त्यातच अक्षयने आपल्या मराठी दोस्ताचं केलेलं कौतुक चाहत्यांना खूपच आवडल्याचे दिसत आहे.वेड चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
तर रितेशने पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शन केले आहे.
तर खूप काळानंतर जेनेलिया पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
त्यामुळे जेनेलियाच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Ved Teaser | ved teaser out akshay kumar wishes for ritesh deshmukh upcoming movie tweet in marathi

 

हे देखील वाचा :

FIR On Jagdish Patil Of Rapido Bike Taxi | रिक्षा चालकांच्या बेमुदत संपाच्या इशार्‍यानंतर आरटीओकडून रॅपिडोच्या जगदीश पाटीलवर गुन्हा

Pune Crime | भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या युवकासह मित्रावर कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न

Deepak Kesarkar | ‘राज्यपालांबद्दलची भूमिका केंद्राला कळवली, पण जर भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर…’

 

The post Ved Teaser | रितेश आणि जेनेलियाच्या नव्या चित्रपटाचा टीझर रिलीज; अभिनेता अक्षय कुमारच्या ट्विटने वेधले सगळ्यांचे लक्ष appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article