Header

Maharashtra Politics | पाच महिने होऊनही आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी लटकलेलीच; कायद्यात वेळेचे बंधन नसल्याने विधानसभेच्या अध्यक्षांचा वेळ काढूपणा?

Maharashtra Politics | पाच महिने होऊनही आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी लटकलेलीच; कायद्यात वेळेचे बंधन नसल्याने विधानसभेच्या अध्यक्षांचा वेळ काढूपणा?

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Politics | महाराष्ट्रात सत्तांतराचे मोठे नाटक साधारणपणे 5 महिन्यांपूर्वी घडले होते. तेव्हा विधानसभेत तत्कालीन गटनेते एकनाथ शिंदे यांनी 5 जुलै 2022 रोजी विश्वासदर्शक ठराव मांडला होता. या ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सर्व शिवसेना आमदारांना व्हीप बजावला होता. तेव्हा, शिंदेबरोबर असलेले 40 आमदार सोडता उरलेल्या 15 आमदारांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले होते. या 15 आमदारांपैकी आदित्य ठाकरे सोडून उर्वरित 14 आमदारांना व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी अपात्र करण्याची नोटीस शिंदे गटाने बजावली होती. (Maharashtra Politics)

 

 

तर दुसरीकडे विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा व्हीप शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने काढला होता. त्यामुळे शिंदे गटातील ज्या 40 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले त्यांनी व्हीपचे उल्लंघन केले म्हणून, अपात्र करण्याची नोटीस ठाकरे गटाने बजावली होती. आता एकनाथ शिंदेंच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने आणि विरोधात मतदान करणाऱ्या आमदारांविरोधातील अपात्रतेच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेली सुनावणी गेले पाच महिने प्रलंबित आहे. अशा प्रकरणात सुनावणी किती कालावधीत पूर्ण करायची याचे कोणतेही बंधन कायद्यात नसल्याने हे अपात्रतेचे प्रकरण बराच काळ लांबेल, असे दिसत आहे. (Maharashtra Politics)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांना अपात्र
करण्यासंदर्भात शिंदे गटाने बजावलेल्या नोटीसप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 29 नोव्हेंबर रोजी
होण्याची शक्यता आहे. मात्र, नियमानुसार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विधिमंडळावर बंधनकारक नाही.
दरम्यान, या प्रकरणात शिंदे गटाच्या 40 आमदारांना आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना तुम्हाला अपात्र का
करण्यात येऊ नये, असा प्रश्न विचारणारी नोटीस बजावली आहे. परंतु सर्व आमदारांनी या नोटीसला उत्तर
देण्यासाठी वेळ मागून घेतला असून त्यामुळे पाच महिने होऊनही ही सुनावणी पूर्ण होऊ शकलेली नाही.

 

 

Web Title :- Maharashtra Politics | disqualification hearing of 54 mlas hangs for five months due to lack of clarity in the law the case of the assembly speaker was stalled

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील गंग्या गँगच्या म्होरक्यासह 7 जणांवर मोक्का कारवाई, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 108 वी कारवाई

Taapsee Pannu | तापसी पन्नूचा आगामी चित्रपट होणार ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

Pune Pimpri Crime | इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना प्रेमात पडला, एकतर्फी प्रेमातून पतीसमोर मिठी मारुन केला विनयभंग

 

The post Maharashtra Politics | पाच महिने होऊनही आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी लटकलेलीच; कायद्यात वेळेचे बंधन नसल्याने विधानसभेच्या अध्यक्षांचा वेळ काढूपणा? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article