Header

Navneet Rana | सुषमा आंधारेंच्या टीकेला नवनीत राणांचे प्रत्युत्तर, ‘कुणाला आळशी माणूस बघायचा असेल, तर ‘मातोश्री’वर…’

Navneet Rana | सुषमा आंधारेंच्या टीकेला नवनीत राणांचे प्रत्युत्तर, ‘कुणाला आळशी माणूस बघायचा असेल, तर ‘मातोश्री’वर…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Navneet Rana | शिवसेना (Shivsena) उपनेत्या सुषमा आंधारे (Sushma Andhare) या सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपा (BJP) समर्थक खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी सुषमा आंधारेंना प्रत्युत्तर देताना थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. राणा यांनी उद्धव ठाकरेंना ‘आळशी माणूस ऑफ द इयर’ म्हटले आहे. आता शिवसेनेकडून कोणते प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्वाचे आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सुषमा आंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता नवनीत राणा म्हणाल्या, एकतर मी त्यांना ओळखत नाही. ज्या पद्धतीने त्या टीका करत आहेत, ज्या पद्धतीने त्या अभिनय करत आहेत, ज्या पद्धतीने त्या मॅडम बोलत आहेत. त्यांनी आधी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मग देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात आळशी माणूस म्हटले. मला नवल वाटत आहे. त्यांना जर आळशी माणूस शोधायचाय, तर ‘मातोश्री’मध्ये जाऊन शोधावा. तो आळशी माणूस त्यांना तिथे भेटेल.

 

नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या, आळशी माणूस ऑफ द इयर कुणाला शोधायचा असेल, तर त्यांना त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षांना शोधता येईल. उद्धव ठाकरे जेवढे संपूर्ण 56 वर्षांत फिरले नसतील, तेवढे या तीन महिन्यांत फडणवीस फिरले असतील. त्यामुळे आळशी माणूस जर कुणाला शोधायचा असेल, तर त्यांनी मातोश्रीवर जाऊन शोध घेतला पाहिजे.

 

पती रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यातील वादावर त्या म्हणाल्या,
जनतेची जबाबदारी आमच्यावर आहे. ती पार पाडण्यासाठी दिल्ली असो किंवा अजून कुठे असो, तिथे मी जाणार.
कालही दोन्ही आमदारांना तोच संदेश मी दिला की दोघांनी शांतता ठेवली पाहिजे.
सगळ्यांना सोबत येऊन कामाला सुरुवात केली पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सामान्य लोकांमध्ये जाऊन
काम करत आहेत. मला वाटते सगळ्यांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Navneet Rana | navneet rana targets uddhav thackeray shivsena sushma andhare on devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Kartiki Ekadashi | औरंगाबादचे दाम्पत्य ठरले महापूजेचे मानकरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची सपत्नीक महापूजा

Pune Crime : फरार सराईत गुंड रुपेश मारणे आणि संतोष शेलारला मुळशीतून अटक

Chandrakant Patil On Jayant Patil | चंद्रकांत पाटलांनी सांगितला ’50 खोके एकदम ओक्के’चा अर्थ, जयंत पाटलांवर पलटवार करताना म्हणाले…

 

The post Navneet Rana | सुषमा आंधारेंच्या टीकेला नवनीत राणांचे प्रत्युत्तर, ‘कुणाला आळशी माणूस बघायचा असेल, तर ‘मातोश्री’वर…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article