Header

Pune Crime : फरार सराईत गुंड रुपेश मारणे आणि संतोष शेलारला मुळशीतून अटक

Pune Crime : फरार सराईत गुंड रुपेश मारणे आणि संतोष शेलारला मुळशीतून अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime : शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्या व्यावसायिकाचे अपहरण करुन मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुंड रुपेश मारणे (Gangster Rupesh Marne) याला साथीदारासह मुळशीतून (Mulshi) अटक करण्यात आली. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

रुपेश मारणे आणि संतोष शेलार (Santosh Shelar) अशी अटक केलेल्या दोघा फरार गुंडाची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. (Pune Crime)

 

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे (Gangster Gajanan Marne) याच्यासह १५ जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मोक्का कारवाई (MCOCA Action On Gajanan Marne Gang) केली. तसेच त्यांना आश्रय देणाऱ्यांवरही मोक्का कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला होता. त्यानंतर सातारा येथून गज्या मारणे याला पोलिसांनी अटक केली असली तरी रुपेश मारणे व त्याचे साथीदार फरार होते.

 

त्यानंतर रुपेश मारणे याने आणखी एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता.
एका व्यावसायिकाने बांधकाम व्यवसायासाठी १ कोटी ८५ लाख रुपये घेतले होते.
त्या बदल्यात २ कोटी ३० लाख रुपये परत दिले होते. तरीही आणखी ६५ लाखांची मागणी करुन या व्यावसायिकाला धमकाविले जात होते.
याप्रकरणी रुपेश मारणेसह चौघांवर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या दोन्ही गुन्ह्यात पोलीस रुपेश मारणे याचा शोध घेत होते. मुळशी परिसरात तो असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून रुपेश व संतोष शेलार दोघांना पकडले.

 

 

Web Title :- Pune Crime : Pune Police Crime Branch Arrest Gangster Rupesh Marne And Santosh Shelar

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil On Jayant Patil | चंद्रकांत पाटलांनी सांगितला ’50 खोके एकदम ओक्के’चा अर्थ, जयंत पाटलांवर पलटवार करताना म्हणाले…

Pune Baramati Crime | बारामतीमधील भिगवण रोडवर पत्रकारावर गोळीबार! सायंकाळी सव्वा 7 वाजताची घटना, पोटाच्या खाली गोळी लागल्याने रिपोर्टर रूग्णालयात

Pathan Movie | बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा ‘पठाण’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, करण्यात आला ‘कॉपी पेस्ट’चा आरोप

 

The post Pune Crime : फरार सराईत गुंड रुपेश मारणे आणि संतोष शेलारला मुळशीतून अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article