Pune Crime | व्यसनी मुलाच्या डोक्यात कुर्हाडीने वार करुन वडिलांनी केला खून, मावळ मधील घटना
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | दारु पिऊन त्रास देणार्या व्यसनी मुलाच्या डोक्यात कुर्हाडीने वार करुन वडिलांनी खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime) मावळ तालुक्यातील (Maval Taluka) सुदंबरे गावामधील बोरकर वस्तीत घडली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
समीर बाळू बोरकर (वय 34) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी बाळू बबन बोरकर (वय 55, रा. बोरकर वस्ती, सदुंबरे, ता. मावळ) यांना अटक (Arrest) केली आहे. याबाबत पूनम विशाल बोरकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार बोरकर वस्तीत मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर याला मागील 10 वर्षापासून दारुचे व्यसन होते.
तो मिळेल तेथे वेल्डींगचे काम करत होता. फिर्यादी यांचे सासरे आणि दीर समीर हे मधून मधून दारु पितात.
दीर हा जास्तच दारु पित (Drink Alcohol) असल्याने त्याचे लग्न जमत नव्हते व त्यावरुन दोघांमध्ये भांडणे होत
असत. त्यावरुन त्यांच्या मारामारीही होत होती. घरातील इतर त्यांची ही भांडणे सोडवत.
बाळू यांनी समीरला दारु पिऊ नको, असे वारंवार सांगितले होते.
1 नोव्हेबर रोजी समीर हा पुन्हा दारु पिऊन घरी आला होता.
तो घरातील हॉलमध्ये बसला असताना रागाच्या भरात बाळू यांनी कुर्हाडीने डोक्यात वार करुन त्याचा खून केला. याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बाळू बोरकर याला अटक करुन रक्ताने माखलेली कुर्हाड जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | The father killed the addicted son by hitting him on the head with an axe, an incident in Maval
हे देखील वाचा :
Ind Vs Ban T20 World Cup | विराटच्या बॅटिंगवर अनुष्का झाली फिदा, दिली ‘हि’ Reaction
Raj Kundra | पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? विचारणाऱ्या ट्रोलरला राज कुंद्राने दिले ‘हे’ उत्तर
The post Pune Crime | व्यसनी मुलाच्या डोक्यात कुर्हाडीने वार करुन वडिलांनी केला खून, मावळ मधील घटना appeared first on बहुजननामा.