Header

Retired Addl Collector R.L. Gagrani Arrested | सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी आर.एल. गगराणी यांना पुण्यातून अटक, नांदेड अ‍ॅन्टीकरप्शनची कोथरूड-कर्वेनगर परिसरात कारवाई

Retired Addl Collector R.L. Gagrani Arrested | सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी आर.एल. गगराणी यांना पुण्यातून अटक, नांदेड अ‍ॅन्टीकरप्शनची कोथरूड-कर्वेनगर परिसरात कारवाई

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Retired Addl Collector R.L. Gagrani Arrested | सेवानिवृतत अपर जिल्हाधिकारी आर.एल. गगराणी (Ramnarayan Laxminarayan Gagrani) (रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी) वय -65, रा. शारदानगर, नांदेड यांना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (Nanded ACB Trap) आज (शुक्रवारी) पुण्यातील कोथरूड-कर्वेनगर परिसरातून अटक केली आहे. गगराणी यांच्याविरूध्द नांदेड जिल्हयातील वजीराबाद पोलिस ठाण्यात (Wajirabad Police Station) अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात गगराणी यांना अटक करण्यात आली आहे. गगराणी यांना पुण्याच्या कर्वेनगर (Karve Nagar, Pune) परिसरातून पथकाने नांदेड अ‍ॅन्टी करप्शनच्या टीमने ताब्यात घेतले. याबाबत नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (SP Dr. Rajkumar Shinde) यांच्याशी पोलीसनामाने संपर्क साधला असता त्यांनी सदरील वृत्तास दुजोरा दिला आहे. (Retired Addl Collector R.L. Gagrani Arrested)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आर.एल. गगराणी यांच्यावर वजीराबाद पोलिस ठाण्यात अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गगराणी यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 45 टक्के अधिक संपत्ती बाळगल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गगराणी हे पुण्यातील कर्वेनगर परिसरात त्यांच्या जावयाकडे रहावयास आल्याची माहिती नांदेडच्या अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकास मिळाली. त्यानंतर नांदेड एसीबीच्या पथकाने पुण्यातील कर्वेनगर परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत. गगराणी यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Retired Addl Collector R.L. Gagrani Arrested)

 

दरम्यान, सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी आर. एल. गगराणी यांना अपसंपदा बाळगल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाकडून अटक झाल्याने राज्यातील प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Retired Addl Collector R.L. Gagrani Arrested | Retired Additional Collector R.L. Gagrani arrested from Pune, Nanded anti-corruption action in Kothrud-Karvenagar area of pune

 

हे देखील वाचा :

CCL | सीसीएलकडून पुण्‍यामध्‍ये वनस्‍पती-आधारित मांस उत्‍पादनांची श्रेणी लॉन्‍च

Lingayat Community | राज्यस्तरीय उच्च शिक्षीत लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा रविवारी पुण्यात

Gulabrao Patil | ‘सुषमा अंधारे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट’, गुलाबराव पाटलांची जळजळीत टीका

Maharashtra Police Recruitment | अखेर पोलीस भरतीचा मार्ग मोकळा, कमाल वयोमर्यादेत शिथिलता; ‘या’ उमेदवारांना होणार फायदा

 

The post Retired Addl Collector R.L. Gagrani Arrested | सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी आर.एल. गगराणी यांना पुण्यातून अटक, नांदेड अ‍ॅन्टीकरप्शनची कोथरूड-कर्वेनगर परिसरात कारवाई appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article