Header

Sanjay Raut | ‘उदयनराजेंचे अश्रू म्हणजे महाराष्ट्राचे अश्रू’

Sanjay Raut | ‘उदयनराजेंचे अश्रू म्हणजे महाराष्ट्राचे अश्रू’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या वक्तव्यावर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांची भूमिका पुण्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे भोसले यांना त्यांचे अश्रू आवरता आले नाहीत. या घटनेनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहीले, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे अश्रू म्हणजे, ते महाराष्ट्राचे अश्रू. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात हीच भावना आहे, की शिवरायांचा हा अपमान सहन करण्यापेक्षा मरण का नाही आलं?
त्यांनी ही भावना म्हणजे, महाराष्ट्राची भावना आहे. पण मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हे अत्यंत हतबल
होऊन त्यांचा अपमान पाहत आहे आणि याउपर शिवप्रताप दिन साजरा करत आहे, हा सर्व ढोंगीपणा आहे.”

 

तत्पूर्वी, पुण्यातील पत्रकार परिषदेदरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांना अश्रू अनावर झाले होते.
“जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करता येत नसेल, तर आपण शिवाजी महाराजांचे नाव
पुसून टाकू. हे बेगडी प्रेम कशाला हवे? शिवाजी महाराजांचे पुतळे, शिवजयंती, शिवप्रताप दिन कशाला हवेत?
हे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं,” असे ते म्हणाले होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Sanjay Raut | we have seen the tears of udayanraje bhosle sanjay raut

 

हे देखील वाचा :

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; पिकअप वाहन उलटले, 7 जण जखमी

Pune Crime | हॉटेलमध्येच पतीने केला पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, मुंढवा परिसरातील घटना

Pune ACB Trap | 2 लाखांच्या लाच प्रकरणी पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील क्षीरसागरसह दोघांना अटक, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Rupali Thombare Patil | रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी नियुक्ती

 

The post Sanjay Raut | ‘उदयनराजेंचे अश्रू म्हणजे महाराष्ट्राचे अश्रू’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article