Header

Pune ACB Trap | 2 लाखांच्या लाच प्रकरणी पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील क्षीरसागरसह दोघांना अटक, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune ACB Trap | 2 लाखांच्या लाच प्रकरणी पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील क्षीरसागरसह दोघांना अटक, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune ACB Trap | मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या (Pune Police Crime Branch) पोलीस कर्मचार्‍यासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. (Pune ACB Trap)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलीस शिपाई दीपक प्रल्हाद क्षीरसागर (वय ३४) गुन्हे शाखा युनिट ३ आणि सिमोन अविनाश साळवी (वय २७) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई खडकी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा केली आहे. (Pune ACB Trap)

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आले होते.
त्यात त्याला आरोपी न करणे व अटक न करणे यासाठी पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर याने २ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
क्षीरसागर याने २ लाख रुपयांपैकी ३० हजार रुपये साळवी याच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानंतर खडकी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा सापळा रचला.
तक्रारदाराकडून सिमोन साळवी याने ३० हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले.
त्यानंतर क्षीरसागरलाही ताब्यात घेण्यात आले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune ACB Trap | 2 lakhs in bribery case, Pune city police arrested two people including Kshirsagar of the crime branch, anti-bribery department action

 

हे देखील वाचा :

Sushma Andhare | अरेच्च्या विसरलेच! सध्या तुमच्या मताला…, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना खोचक टोला

Pune PMC News | पर्वतीवरील जमिनीसाठी पुणे मनपाची सर्वोच्च न्यायालयात धाव

Pune Rickshaw Strike | राज ठाकरेंच्या भेटीनंतर पुण्यातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आपापसात भिडले

 

The post Pune ACB Trap | 2 लाखांच्या लाच प्रकरणी पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील क्षीरसागरसह दोघांना अटक, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article