Devendra Fadnavis | पुणे शहरातील पर्वती आणि पद्मावती विभागात ग्राहकांना सदोष वीज देयके, देवेंद्र फडणवीसांची कबुली; अभियंत्यांवर कारवाई सुरु
नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरातील पर्वती (Parvati) आणि पद्मावती (Padmavati) विभागांअंतर्गत अनेक ग्राहकांना सदोष वीज देयक (Electricity Bill) देण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याची कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळात दिली. तसेच या प्रकरणामध्ये संबंधित अभियंत्यांवर कारवाई सुरु करण्यात आली असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ग्राहकांना सदोष वीजदेयक देण्यात येत असल्याची कबुली दिली. ग्राहकांना चुकीची वीजदेयक देण्यात येत असल्याने ग्राहकांना नाहक त्रास झाला आहे. तसेच त्यांना आर्थिक भुर्दंड पडला आहे. मीटर वाचनात तफावत, संबंधित यंत्रणेकडून होणाऱ्या निष्काळजीपणामुळे चुकीची वीजदेयक येत असून त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, असे आमदार भीमराव तापकीर यांनी निदर्शनास आणून दिले.
यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पर्वती आणि पद्मावती विभागांतर्गत गेल्या तीन महिन्यापासून नेहमीच वीज देयकांची टक्केवारी सुमारे 95 ते 96 टक्के एवढी आहे.
वाढीव वीजदेयकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास ग्राहकांच्या मीटर वाचनाची आणि प्रत्यक्ष वीजवापराची स्थळ तपासणी करुन आवश्यकतेनुसार देयक दुरुस्ती करण्यात येते.
ग्राहकाला वीजदेयकाबाबत कोणतीही तक्रार असेल तर संबंधित ग्राहकाला उपविभागीय कार्यालय,
महावितरणचे संकेतस्थळ (Mahavitran), मोबाईल अॅप इत्यादी ठिकाणी तक्रार दाखल करण्याचे पर्याय
उपलब्ध आहेत आणि त्या तक्रारींचे त्वरित निरसन करण्यात येत असलाचे फडणवीस यांनी सांगितले.
रस्ता पेठ शहर मंडळात ऑक्टोबर 2022 मध्ये पर्वती आणि पद्मावती या विभागात प्रत्येकी एक अशा दोन
ग्राहकांना अवास्तव वीजदेयक दिल्याचे निदर्शनास आले होते.
या ग्राहकांचे वीजदेयक महावितरण कंपनीच्या नियमानुसार लगेच दुरुस्त करुन दिले आहे.
तसेच याबाबत चौकशी करुन संबंधित अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरु असल्याचे, फडणवीस यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Devendra Fadnavis | deputy chief minister fadnavis confession of faulty electricity payments to customers in parvati padmavati area
हे देखील वाचा :
The post Devendra Fadnavis | पुणे शहरातील पर्वती आणि पद्मावती विभागात ग्राहकांना सदोष वीज देयके, देवेंद्र फडणवीसांची कबुली; अभियंत्यांवर कारवाई सुरु appeared first on बहुजननामा.