Himanshi Khurana | परदेशात शूटिंग करताना ‘या’ अभिनेत्रीची प्रकृती ढासळली; रुग्णालयात करण्यात आले दाखल
बहुजननामा ऑनलाईन टीम : पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना (Himanshi Khurana) हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्री तिच्या आगामी पंजाबी चित्रपटाचे शूटिंग करत होती. यादरम्यान तिने रोमानियामध्ये उणे 7 डिग्री सेल्सिअस तापमानात शूटिंग केलं आणि ती आजारी पडली. यावेळी तिला मोठ्या प्रमाणात ताप आला आणि तिच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्यामुळे तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिमांशी खुराना (Himanshi Khurana) हि रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 13’ मधून प्रसिद्धीझोतात आली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हिमांशी सध्या रोमानियामध्ये ‘फत्तों दे यार बडे ने’ या पंजाबी चित्रपटाच्या शुटींगसाठी गेली होती. या चित्रपटात हिमांशीसह इंदर चहल, निशा बानू यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, हिमांशीला ताप होता, पण तरीही ती शूटिंग करत होती. चित्रपटातील एका दृश्यासाठी तिला थंड पाण्यात शूट करायचं होतं. पण, तिची प्रकृती बिघडल्याने नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्यानंतर तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अभिनेत्री हिमांशीवर (Himanshi Khurana) सध्या उपचार सुरू असून डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
अभिनेत्रीच्या तब्येतीबाबत कोणतेही अपडेट नसले तरी. हिमांशीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती,
ज्यामध्ये ती थंडीपासून बचावासाठी भरपूर कपडे परिधान करून दिसत होती.
तसेच ‘थंडी खूप आहे पण शूट करावे लागेल,’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Himanshi Khurana | bigg boss fame punjabi actress himanshi khurana admitted hospital in romania due to fever bleeding
हे देखील वाचा :
The post Himanshi Khurana | परदेशात शूटिंग करताना ‘या’ अभिनेत्रीची प्रकृती ढासळली; रुग्णालयात करण्यात आले दाखल appeared first on बहुजननामा.