Header

Filmfare Awards | शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त

Filmfare Awards | शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त

बहुजननामा ऑनलाईन – नुकताच 2022 चा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Awards) पार पडला. यामध्ये शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला देखील पुरस्कार देण्यात आले आहे. ‘वारसा’ असे या माहितीपटाचे नाव आहे. या माहितीपटाची निर्मिती कोल्हापुरातील सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे. तर या माहितीपटाला बेस्ट फिल्म नॉन फिक्शन गटातून फिल्मफेअर पुरस्काराने (Filmfare Awards) सन्मानित करण्यात आले. मुंबईतील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये हा पुरस्कार समारंभ पार पडला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धतंत्र निर्माण केले होते. त्याचा वारसा आजही कोल्हापुरातील काही लोक जपतात आणि याला शिवकालीन युद्ध कला या नावाने ओळखले जाते.
या माहितीपटातून याच युद्ध कलेचा वारसा कोल्हापुरातील स्थानिक कसे जपतात यासाठी काय प्रयत्न करतात हे दाखवण्यात आले आहे.
या माहितीपटांमध्ये वस्तादांच्या व खेळाडूंच्या मुलाखती काही प्रत्यक्ष खेळ असे एकूण 25 मिनिटाचा हा माहिती पट आहे.
(Filmfare Awards)

 

 

कोल्हापुरात आजही विविध कुस्ती, मल्लखांब, शिवकालीन युद्ध कला अशा खेळांचा समावेश आहे आणि अशाच
या खेळांविषयी माहिती या माहितीपटातून मांडण्यात आली आहे. या माहितीपटासाठी संदीप पाटील, प्रसाद पाध्ये,
सतीश सूर्यवंशी, सिद्धेश सांगावकर, चिन्मय जोशी, कविता ननवरे, कुणाल सूर्यवंशी, डॉ. शरद भुताडिया,
अमित पाध्ये, मीनार देव, प्रशांत भिलवडे, मंदार कमलापूरकर, शुभम जोशी, विनायक कुरणे, किरण देशमुख,
सचिन गुरव व सहकार्‍यांनी मोलाची साथ दिली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Filmfare Awards | A documentary based on the war art of the Shiva period won this year’s Filmfare Award

 

हे देखील वाचा :

Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकरच्या क्लासिक लुकने इंस्टाग्रामवर लावली ‘आग’

MP Navneet Rana | नवनीत राणांच्या अडचणीत वाढ! अटक वॉरंटची अंमलबजावणी करा; मुंबई न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

Dhangar Reservation | आदिवासी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण नको – राजेंद्र गावित

 

The post Filmfare Awards | शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article