Header

Gopichand Padalkar | ‘आता आरक्षण बस झालं’ शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन पडळकरांचा हल्लाबोल म्हणाले-‘हे आरक्षणाच्या विरोधात, त्यांचा खरा चेहरा…’

Gopichand Padalkar | ‘आता आरक्षण बस झालं’ शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन पडळकरांचा हल्लाबोल म्हणाले-‘हे आरक्षणाच्या विरोधात, त्यांचा खरा चेहरा…’

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी आरक्षणासंदर्भात (Reservation) विधान केलं होतं. संभाजी ब्रिगेडने आरक्षणासाठी संघर्ष केला, मागण्या केल्या. आता आरक्षण-आरक्षण बस झालं, जोपर्यंत नव्या पिढीचं अर्थकरण बदलत नाही, तोपर्यंत समाजातील त्यांचं स्थान बदलणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते. पवार यांच्या वक्तव्यावर भाजप आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला. हे आरक्षणाच्या विरोधात आहेत, हा संदेश राज्यात गेला. त्यांचा खरा चेहरा या विधानानंतर समोर आला असल्याचा टोला पडळकर (Gopichand Padalkar) यांनी लगावला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, खरेतर सगळ्या लोकांनी यांना निटपणे ओळखलं आहे. राज्यातील गोरगरीब लोकांची पिळवणूक सुरु आहे, ती सुरु राहिली पाहिजे, असं त्यांना वाटतं. पण आम्हाला राजकीय सत्तेत वाटा मिळाला नाही, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहोत. नोकरीत टक्का नाही आहे. तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पाट्या उपेक्षित लोकांच्या दिसतात का? ही तफावत कमी करण्यासाठी आम्हाला आरक्षण मिळाले आहे, असं पडळकर यांनी सांगितले.

 

शरद पवारांना कोणत्या दृष्टीतून आरक्षण नको आहे, हे राज्याला सांगितले पाहिजे. मात्र हे आरक्षणाच्या विरोधात आहोत,
हा संदेश राज्यात गेला. त्यांचा खरा चेहरा या विधानानंतर समोर आला आहे.
मताचे राजकारण करताना शरद पवार पुढे असतात.
शालिनी पाटील (Shalini Patil) यांनी मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी केली
तर त्यांना पक्षातून काढून टाकले. लोक शरद पवारांच्या विधानाकडे गांभीर्याने पाहत नाहीत, असा टोला पडळकरांनी लगावला.

 

Web Title :- Gopichand Padalkar | gopichand padalkar criticized sharad pawar on reservation statement

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांनी शिक्षणमंत्री केसरकर घायाळ; असं काय घडलं नेमकं?

Weight Loss Tips | या ४ प्रकारे करा ओव्याचे सेवन, मिळेल इलियाना डिक्रूजसारखी Zero Figure

Devendra Fadnavis | मंत्रालयातील बोगस नोकर भरती प्रकरणी चौकशीनंतर कारवाई- उपमुख्यमंत्री फडणवीस (व्हिडिओ)

Pune Crime News | ब्रेड परत करण्यासाठी गेलेल्या मुलास बेदम मारहाण, समर्थ पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा

 

The post Gopichand Padalkar | ‘आता आरक्षण बस झालं’ शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन पडळकरांचा हल्लाबोल म्हणाले-‘हे आरक्षणाच्या विरोधात, त्यांचा खरा चेहरा…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article