Header

Pune Crime News | प्रेमविवाह केल्याने गुंडांकडून तरुणीला भर रस्त्यात बेदम मारहाण, येरवड्यात 2 गुडांच्या टोळ्यांचा 3 तास राडा

Pune Crime News | प्रेमविवाह केल्याने गुंडांकडून तरुणीला भर रस्त्यात बेदम मारहाण, येरवड्यात 2 गुडांच्या टोळ्यांचा 3 तास राडा

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून येरवड्यात दोन गटात खून, खुनाचे प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल असताना आता दुसर्‍या गटातील मुलाशी प्रेमविवाह (Love Marriage) का केला, या कारणावरुन गुंडांनी तरुणीला बेदम मारहाण करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. त्याविरोधात खूनाची केस माघार घेत नसल्याने गुंडांनी कोयत्याने मारहाण करुन दहशत माजविल्याचा गुन्हा दाखल केला आहे. येरवड्यातील मच्छी मार्केट (Fish Market, Yerwada) परिसर आणि शेलार चाळ परिसरात रात्री साडेनऊ ते मध्यरात्री साडेबारा असा तीन तास गुंडाचा हैदोस सुरु होता. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पायल दत्ता साठे (वय २०, रा. मच्छी मार्केट, येरवडा) हिने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६२२/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जय अ‍ॅथोनी, अनिकेत जगन्नाथ काकडे, गणेश् जगताप, सोनु ऊर्फ रॅडो (रा. शेलार चाळ, येरवडा) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार येरवड्यातील मच्छी मार्केट येथे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील दोन गटात यापूर्वी पासून भांडणे सुरु आहेत. फिर्यादी यांनी तीन महिन्यांपूर्वी दत्ता ऊर्फ अनिकेत राजू साठे याच्याबरोबर आळंदी येथे प्रेमविवाह केला. फिर्यादीचे चाळीतील आरोपींनी तू साठ्याच्या पोराशी लग्न का केले, आता तुला सोडणार नाही, असे म्हणून जय अ‍ॅथोनीने धारधार हत्याराने तिच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने तो हाताने अडविला. इतरांनी तिचे केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जय अ‍ॅथोनीने हत्यार हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.

 

याविरोधात जगन्नाथ तुकाराम काकडे (वय ५५, रा. शेलार चाळ, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदित्य गमरे, अनिकेत ऊर्फ दत्ता राजू साठे, रोनक चव्हाण ऊर्फ टक्क्या, अभय जंगले, अमन भिसे, ऋतिक साठे, राजू कचरु साठे (वय ५०, रा. मदरतेरेसा नगर, येरवडा) या गुंडांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचा लहान मुलगा आदर्श काकडे याचा २७ जून २०१९ रोजी खून झाला होता. त्या खूनामध्ये शुभम साठे, अनिकेत साठे, ऋतिक साठे, रोहन साठे, रोनक चव्हाण, अभय जंगले, राजू साठे, सिमा साठे इत्यादी आरोपी होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तेव्हापासून हा गुन्हा मिटवून घेण्यासाठी सारखे सारखे फिर्यादीच्या गल्लीत येऊन भांडणे करत असतात.
३० डिसेबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता आरोपी हातात कोयते घेऊन गल्लीत येऊन फिर्यादीच्या दिशेने येत होते.
फिर्यादी हे दारात असताना त्यांच्यावर वार केला. ते खाली वाकल्याने वार घराच्या दरवाजावर बसला.
फिर्यादी यांनी दरवाजा लावून घेऊन घराच्या टेरेसवर गेले असताना आरोपींनी मोठ मोठ्याने आरडा ओरडा करुन केस माघारी घे,
नाही तर तुला व तुझ्या घरच्यांना मारुन टाकीन खल्लास करीन, तुमची वस्ती जाळून टाकीन,
अशी धमकी दिली. पोलिसांनी दोन्ही गटावर गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Young girl beaten up by gangsters on the road for love marriage, 2 gangs of gangsters in Yerwada shouted for 3 hours

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव म्हणजे फुसका बॉम्ब, बावनकुळे यांनी लगावला टोला (व्हिडिओ)

Pune Crime News | मंडईतील रामेश्वर चौकातील गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना अटक; अक्षय वल्लाळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी करायची होती ‘गेम’

Ahmednagar Firing Case | साई पालखीत गोळीबार, एकजण गंभीर जखमी; संशयित ताब्यात

 

The post Pune Crime News | प्रेमविवाह केल्याने गुंडांकडून तरुणीला भर रस्त्यात बेदम मारहाण, येरवड्यात 2 गुडांच्या टोळ्यांचा 3 तास राडा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article