Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पूना क्लब, इव्हॅनो इलेव्हन संघांचा दुसरा विजय !
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – बालन ग्रुपतर्फे आयोजित दुसर्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ (Indrani Balan Winter T-20 League) अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पूना क्लब आणि इव्हॅनो इलेव्हन संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. (Indrani Balan Winter T-20 League)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत दीपक शिळीमकर याच्या कामगिरीच्या जोरावर पूना क्लब संघाने माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा ४ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना माणिकचंद ऑक्सिरीच संघाने १२८ धावा केल्या. अनिकेत पोरवाल याने ५१ धावांची, तर दर्शित मोदी याने नाबाद २६ धावांची खेळी केली. हे आव्हान पूना क्लब संघाने १८.१ षटकांत व ६ गडी गमावून पूर्ण केले. अकिब शेख (३७ धावा), अजिंक्य नाईक (३३ धावा) आणि दीपक शिळीमकर (२२ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाचा सलग दुसरा विजय साकार केला. (Indrani Balan Winter T-20 League)

राकेश मते याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर इव्हॅनो इलेव्हन संघाने ब्रेव्हहार्ट क्रिकेट अकॅडमी संघाचा ९२ धावांनी पराभव केला. इव्हॅनो इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना १८६ धावांचे आव्हान उभे केले. नितिश कुकडेजा (४९ धावा), योगिराज देशमुख (३४ धावा), शिवराज शिंदे (३०) आणि राकेश मते (नाबाद २० धावा) यांनी संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रेव्हहार्ट क्रिकेट अकॅडमीचा डाव ९४ धावांवर गडगडला. राकेश मते (३-२०) आणि प्रसाद गुरव (३-९) यांनी ब्रेव्हहार्ट संघाचा डाव झटपट गुंडाळला.

सामन्याचा संक्षिप्त निकाल : गटसाखळी फेरी –
माणिकचंद ऑक्सिरीच – २० षटकांत ७ गडी बाद १२८ धावा (अनिकेत पोरवाल ५१ (४४, ३ चौकार, ३ षटकार),
दर्शित मोदी नाबाद २६, विश्वराज शिंदे २-१७, दीपक शिळीकमर १-८) पराभूत वि. पूना क्लब – १८.१ षटकांत ६ गडी
बाद १२९ धावा (अकिब शेख ३७, अजिंक्य नाईक ३३, दीपक शिळीमकर २२, रोहन फंड २-१३); सामनावीर – दीपक शिळीमकर;
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
इव्हॅनो इलेव्हन – २० षटकांत ६ गडी बाद १८६ धावा (नितिश कुकडेजा ४९, योगिराज देशमुख ३४, शिवराज शिंदे ३०,
राकेश मते नाबाद २०, विजयकुमार मामिडीशेट्टी २-३८) वि.वि. ब्रेव्हहार्ट क्रिकेट अकॅडमी – १६.४ षटकांत १० गडी
बाद ९४ धावा (वैभव लवांडे २६, गणनायक सिंग २१, राकेश मते ३-२०, प्रसाद गुरव ३-९); सामनावीर – राकेश मते.
Web Title :- Indrani Balan Winter T-20 League | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Pune Club, Ivano XI teams second win!
हे देखील वाचा :
Pune Crime | पोलीस असल्याचे सांगून 5 लाखांची खंडणी घेणाऱ्या आरोपीला पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
The post Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पूना क्लब, इव्हॅनो इलेव्हन संघांचा दुसरा विजय ! appeared first on बहुजननामा.