Header

Pune Crime | पोलीस असल्याचे सांगून 5 लाखांची खंडणी घेणाऱ्या आरोपीला पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

Pune Crime | पोलीस असल्याचे सांगून 5 लाखांची खंडणी घेणाऱ्या आरोपीला पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करून 5 लाख 5 हजार रुपयांची खंडणी (Extortion) घेतल्याचा प्रकार चंदननगर पोलीस स्टेशन (Chandan Nagar Police Station) हद्दीत घडला आहे. त्यापैकी अडीच लाख रुपये ‘फोन पे’द्वारे घेतले होते, तर एक लाख रोख आणि उर्वरित (Pune Crime) रकमेचा मोबाइल घेतला होता. या प्रकरणामध्ये मधुकर विलास सापळे Madhukar Vilas Saple (वय 32, रा. आंबेगाव) याला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर (Bail Granted) झाला असल्याची माहिती अ‍ॅड. राकेश सोनार (Adv. Rakesh Sonar) यांनी दिली.

 

याबाबत विमाननगर येथील 32 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. 14 एप्रिल ते 15 जून 2022 या कालावधीत हा प्रकार घडला होता. फिर्यादीवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, असे खोटे सांगून, तसेच राहत असलेल्या सोसायटीची निवडणूक रद्द करण्यासाठी ही रक्कम स्वीकारण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करून आरोपी मधुकर सापळे याला अटक केली. आरोपी मधुकर सापळे याने जामिनासाठी अ‍ॅड. राकेश सोनार यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

आरोपी सापळे व फिर्यादी यांच्यात व्यावसायिक नातेसंबंध होते व या व्यवसायातून झालेला नफा आरोपीने फिर्यादी यांना मागितला होता.
याला खंडणी म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने अ‍ॅड. राकेश सोनार यांनी केला.
वकिलांचा युक्तिवाद गृहीत धरून न्यायालयाने आरोपीला 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

 

अ‍ॅड. राकेश सोनार यांना अ‍ॅड. महेश देशमुख (Adv. Mahesh Deshmukh), अ‍ॅड. प्रशांत कांबळे (Adv. Prashant Kamble), अ‍ॅड. नीतेश वाघमारे (Adv. Nitesh Waghmare),
अ‍ॅड. प्रमोद राठोड (Adv. Pramod Rathod) यांनी सहकार्य केले.

 

Web Title :- Pune Crime | Pune court grants bail to accused who claimed to be policeman and extorted 5 lakhs

 

हे देखील वाचा :

Balasaheb Thorat | ‘कर्नाटकात मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री शांत का?’ – बाळासाहेब थोरात

Pune Band News | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात पुणे बंदची हाक ! विविध पक्ष व संघटनांतर्फे 13 डिसेंबरला पुणे बंद आंदोलन

Devendra Fadnavis-Amit Shah | शरद पवारांकडून अल्टिमेटम ! फडणवीसांकडून तातडीने गृहमंत्री अमित शहांना फोन, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी हालचालींना वेग

 

The post Pune Crime | पोलीस असल्याचे सांगून 5 लाखांची खंडणी घेणाऱ्या आरोपीला पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article