Header

Nashik Crime | सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावे लिहून एकाची आत्महत्या, दोघांवर FIR

Nashik Crime | सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावे लिहून एकाची आत्महत्या, दोघांवर FIR

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – Nashik Crime | सुसाइड नोटमध्ये (Suicide Note) भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची नावे लिहून एकाने आत्महत्या केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Former BJP corporator Mukesh Shahane) आणि कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे (Vikram Nagre) असे गुन्हा दाखल झालेल्या दोन पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या (Nashik Crime) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

एका गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीने घोटी येथील भरवीरमध्ये आत्महत्या केली आहे. अनिरुद्ध धोंडू शिंदे (Anirudh Dhondu Shinde) असे आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शिंदे याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये भाजपचे माजी नगरसेवक शहाणे आणि कामगार आघाडी पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. (Nashik Crime) या दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी सुसाइड नोट ताब्यात घेतली असून दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

काही दिवसांपूर्वी माजी नगरसेविकेचे पुत्र भाजप कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या घरावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात सहभागी असल्याच्या संशयावरुन हल्ला करुन खंडणी (Extortion) मागितल्या प्रकरणी अनिरुद्ध शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून नाशिकमधून फरार झाला होता.

 

अनिरुद्ध याने सुसाइड नोट लिहून आत्मह्त्या केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मयत अनिरुद्ध याच्या कुटुंबिय आणि नातेवाईक यांनी चिठ्ठीत उल्लेख केलेल्या दोघांवर गुन्हा दाखल
करण्याची मागणी करुन घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) ठिय्या मांडला होता.
रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरु होता. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
त्यानंतर रात्री उशिरा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Nashik Crime | case registered against bjp workers mukesh shahane and vikram nagare in nashik

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लिलाव भिशीतून चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने 70 लाखांची फसवणूक

Ajit Pawar | अजित पवार सरकारी विमानाने तातडीने मुंबईत दाखल, ‘हे’ प्रमुख कारण

Pune Crime | अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकानेच घातला गंडा

 

The post Nashik Crime | सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावे लिहून एकाची आत्महत्या, दोघांवर FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article