Header

Pune Crime | मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर गोळीबार; भावाने केलेल्या खूनाचा बदला घेण्यासाठी केले कृत्य

Pune Crime | मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर गोळीबार; भावाने केलेल्या खूनाचा बदला घेण्यासाठी केले कृत्य

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | मंडईतील गजबलेल्या रामेश्वर चौकात (Rameshwar Chowk, Mandai) मंगळवारी रात्री दुचाकीवरुन आलेल्या दोघा जणांनी एका तरुणावर गोळीबार (Firing In Pune) करुन कोयत्याने वार (Attempt To Kill) केल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शेखर अशोक शिंदे Shekhar Ashok Shinde (वय ३६, रा. मांजरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. हा प्रकार रामेश्वर चौकात मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर शिंदे हे मंडईतील रामेश्वर चौकातून जात होते.
यावेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला.
एक गोळी त्यांच्या खांद्याजवळून गेली नेहमी गर्दी असलेल्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.
शेखर शिंदे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेखर शिंदे याच्या भावाने एकाचा खून केला होता.
त्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
हल्लेखोरांची नावे समजली असून फरासखाना पोलीस (Faraskhana Police Station) अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Firing on a youth at Rameshwar Chowk in Mandai; The act was done to avenge the murder committed by the brother pune crime news

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; नग्न अवस्थेतील फोटो काढून केले व्हायरल

Ajit Pawar | मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका; म्हणाले, ‘एक देखील…’

PAN- Aadhaar Link | तुमवे पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक आहे का?, जाणून घ्या हे तपासण्याची सोपी पद्धत

HDFC Bank ने फिक्स्ड डिपॉझिटवर वाढवला इंटरेस्ट रेट, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

 

The post Pune Crime | मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर गोळीबार; भावाने केलेल्या खूनाचा बदला घेण्यासाठी केले कृत्य appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article