Header

NCP-Prachi Pawar | नाशिकमध्ये प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला

NCP-Prachi Pawar | नाशिकमध्ये प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – NCP-Prachi Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्राची पवार (NCP Prachi Pawar) यांच्यावर मंगळवारी (दि. 13 डिसेंबर) रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञात टोळक्याने त्यांच्यावर हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात प्राची पवार गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राची पवार (Prachi Pawar) या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत पवार यांच्या कन्या आहेत. तसेच त्या नाशिकमधील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ देखील आहेत. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गोवर्धन शिवार परिसरात हा प्रकार घडला आहे. प्राची पवार गोवर्धन शिवारातील आपल्या फार्म हाऊसमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राची पवार यांच्यावरील हल्ल्यानंतर नाशिक शहरात एकच खळबळ उडाली. त्यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हल्ला झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. या हल्ल्यानंतर प्राची पवार यांना तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

 

 

Web Title :- NCP-Prachi Pawar | attack on ncp woman leader prachi pawar in nashik crime news

 

हे देखील वाचा :

Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, DA बाबत सरकारने ऐकवली वाईट बातमी

Pune Crime | पिण्यासाठी पाणी न दिल्याने सलून मालकावर कोयत्याने वार, आंबेगाव खुर्द येथील घटना

 

The post NCP-Prachi Pawar | नाशिकमध्ये प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article