Pathaan Controversy | दीपिका पदुकोणचा जुना व्हिडीओ व्हायरल; ” रंगाने धर्म निवडला नाही……”
बहुजननामा ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर दीपिका पादुकोण व शाहरुख खान यांचा ‘पठाण’ (Pathaan Controversy) चित्रपटातील गाणे ‘बेशरम रंग’ चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे. या गाण्यांमध्ये दीपिका ने परिधान केलेले वस्त्र हे हिंदू धर्माला दुखावण्याचे काम केल्याचे मत अनेकांनी केले आहे. तर मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांनी देखील अभिनेत्री दीपिका पादुकोणने परिधान केलेला कपड्यांच्या रंगावरून आक्षेप नोंदवला आहे. आता अशातच दीपिकाचा जुना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात वायरल होताना दिसत आहे. (Pathaan Controversy)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हा व्हिडिओ ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे रंग व धर्माचा काहीही संबंध नाही हा सांगणारा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की दीपिका कशा पद्धतीने धर्माने रंग निवडला आहे रंगाने धर्म निवडला नाही कधी कधी व्यक्तीचे मन इतके काळे होते की त्याला प्रत्येक धर्मामध्ये रंग दिसू लागतो असं संवाद या व्हिडिओत दिसत आहे. सध्या बेशरम रंगा या गाण्याने निर्माण झालेल्या वादामुळे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पठाण (Pathaan Controversy) चित्रपटातील गाण्यामुळे वाद निर्माण होत असतानाच हा व्हिडिओ
समोर आल्याने आता याचा काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
तर आता पठाण चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी देखील होत आहे. या संपूर्ण गोष्टीचा चित्रपटावर कितपत
परिणाम होणार हे पाहणे गरजेचे आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pathaan Controversy | deepika padukone shahrukh khan pathaan movie controversy actress old video from bajirao mastani goes viral on social media
हे देखील वाचा :
Taapsee Pannu | तापसी पन्नू झळकणार शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटात; 2023 मध्ये होणार प्रदर्शित
The post Pathaan Controversy | दीपिका पदुकोणचा जुना व्हिडीओ व्हायरल; ” रंगाने धर्म निवडला नाही……” appeared first on बहुजननामा.