Header

Rajabhau More Passes Away | मराठी मनोरंजन सृष्टीतून वाईट बातमी; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन

Rajabhau More Passes Away | मराठी मनोरंजन सृष्टीतून वाईट बातमी; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन

बहुजननामा ऑनलाईन – ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन (Rajabhau More Passes Away) झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल रात्री आठ वाजता त्यांचा मृत्यू (Rajabhau More Passes Away) झाला. त्यांच्या जाण्याने रंगभूमीवर एक पोकळी निर्माण झाली आहे.

 

अमरावतीमध्ये राज्य नाट्य स्पर्धेत प्रयोग बघतानाच त्यांचा मृत्यू झाला. ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ हे नाटक सुरू असतानाच अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने झेनित हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी आजवर त्यांचे संपूर्ण आयुष्य रंगभूमीला समर्पित केले होते आणि शेवटचा क्षण देखील त्यांनी रंगभूमीवरच व्यतीत केला. (Rajabhau More Passes Away)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

त्यांच्या या अशा अचानक जाण्यामुळे अमरावतीकरांना आणि रंगकर्मींना मोठा धक्का बसला आहे.
तर आज त्यांच्या राहत्या घरी अंबागेट अमरावती येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात तीन बहीण दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यंदाच्या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार राजाभाऊ मोरे यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांनी आजवर 100 हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले. नाटकांव्यतिरिक्त ते सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विभागात ही सक्रिय होते.

 

Web Title :- Rajabhau More Passes Away | stage actor rajabhau more passes away

 

हे देखील वाचा :

R M D Foundation | आर एम डी फाऊंडेशनच्या स्पर्धा युवकांना एकत्रीत बांधण्याचे कार्य करते, शोभा आर धारीवाल यांचे प्रतिपादन

Health Tips | निरोगी शरीरासाठी रोज करा या फूडचे सेवन, वेट लॉस आणि इम्युनिटी वाढण्यासह होतील हे ७ मोठे फायदे

Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा, म्हणाले ‘हा महामोर्चा निघणारच, कोणीही…’

Nana Patole | नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप! म्हणाले ‘देशातील तरुण पिढीला नशेच्या आहारी घालवण्याचे….’

 

The post Rajabhau More Passes Away | मराठी मनोरंजन सृष्टीतून वाईट बातमी; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article