Header

PM Modi Mother Heeraben Death News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे 100 व्या वर्षी निधन

PM Modi Mother Heeraben Death News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे 100 व्या वर्षी निधन

अहमदाबाद : वृत्तसंस्था– PM Modi Mother Heeraben Death News | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन (Heeraben) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान निधन झाल्याचे ट्वीट करुन सर्वांना माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तातडीने दिल्लीतून अहमदाबादला आले. घरी जाऊन आपल्या आईचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पार्थिवला खांदा देत अम्बुलन्समधून स्मशान भूमीत नेले. अहमदाबाद येथील स्मशान भूमीत अत्यंसस्कार करण्यात आले. (PM Modi Mother Heeraben Death News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन सांगितले की, मी आईला तिच्या 100 व्या जन्मदिनी भेटलो. तेव्हा तिने एक गोष्ट सांगितली. ‘‘काम करो बुद्धीसे और जीवन जियो शुद्धिसे’’ हा तिचा संदेश कायम लक्षात राहिल.

 

 

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले तरी आईने दिल्लीला न येता अहमदाबाद येथील घरीच राहणे पसंत केले. दरवर्षी आईच्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी आपल्या आईची भेट घेऊन आशिर्वाद घेत असत. १८ जून रोजी त्यांचा १०० वा वाढदिवस पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता.

हिराबेन यांची तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीटमधून आईच्या निधनाचे वृत्त सर्वांना सांगितल्यानंतर देशभरातून शोक संदेश देण्यात आले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणाऱ्या त्यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद असल्याची शोकभावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

“श्रीमती हिराबेन यांच्यासारख्या धर्मानुरागी, सात्विक व्यक्तिमत्त्वाचे निधन ही समाजाची हानी आहे.
नियतीचक्रामुळे आज मोदी यांची इहलोकीची यात्रा संपली.
ही बाब पुत्र म्हणून पंतप्रधान मोदी यांच्यासाठी एक आघात आहे.
आईचा वियोग ही दुःखाची परिसीमा असते. पंतप्रधान मोदी यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मातृतुल्य हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’अशी शोकभावनाही मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केली आहे.

 

Web Title :- PM Modi Mother Heeraben Death News

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला; ‘एकदा मंत्रीमंडळ विस्तार कराचं, उरलेले पण आमदार निघूण…’

MP Sanjay Raut | संजय राऊतांना भाजपच्या ‘या’ आमदाराचे थेट आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल, तर…’

CM Eknath Shinde | धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा

ICC कडून क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन जाहीर; भारताच्या ‘या’ खेळाडूला मिळाले नामांकन

 

The post PM Modi Mother Heeraben Death News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे 100 व्या वर्षी निधन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article