Header

Pune Traffic Police | उद्या (दि. 31 डिसेंबर) पुणे कॅम्प (लष्कर) परिसरातील वाहतूकीत बदल; फर्ग्युसन रोड आणि एमजी रस्ता 10 तासांसाठी नो-व्हेईकल झोन

Pune Traffic Police | उद्या (दि. 31 डिसेंबर) पुणे कॅम्प (लष्कर) परिसरातील वाहतूकीत बदल; फर्ग्युसन रोड आणि एमजी रस्ता 10 तासांसाठी नो-व्हेईकल झोन

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Traffic Police | 31 डिसेंबर रोजी वर्ष अखेर व नतून वर्षारंभाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी नागरिक शहरातील वेगवेगळया रस्त्यांवर मोठया प्रमाणात गर्दी करत असतात. कॅम्प परिसरातील (Pune Camp) एम.जी. रोडवर (MG Road, Pune) 31 डिसेंबर रोजी मोठया प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे वाहतूक कोंडी (Traffic Jam) टाळण्यासाठी मोठया प्रमाणावर बदल करण्यात आले आहे. वाहतूक उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी वाहतूक बदलाबाबतचे आदेश निर्गमीत केले आहेत. (Pune Traffic Police)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

लष्कर (कॅम्प) परिसरातील खालील नमुद रस्त्यांवर दि. 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते गर्दी संपेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलिस वाहने, रूग्णवाहिका इत्यादी) वगळून इतर वाहनांसाठीच्या वाहतूकीत खालील प्रमाणे बदल करण्यात येणार आहेत. (Pune Traffic Police)

 

1. वाय जंक्शन वरून एमजी रोडकडे येणारी वाहतुक ही 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मस्जिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

2. ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक ही बंद करण्यात येणार आहे.

3. व्होल्गा चौकाकडून महंमदरफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे.

4. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलिस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येईल.

5. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक ताबूत स्ट्रीटरोड मार्गे पुढे सोडण्यात येईल. (Changes In Pune Camp Traffic On New Year)

नो-व्हेईकल झोन (दि. 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 ते दि. 1 जानेवारी 2023 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत) New Year 2023

1. फर्ग्युसन रोड – गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेटपर्यंत (FC Road Pune)

2. एमजी रोड – 15 ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर. (MG Road Pune)

 

दि. 31 डिसेंबर 2022 रोजी वाहतुक शाखेतर्फे ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
ड्रिंक करून वाहन चालविणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे. सदर ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हची कारवाई करताना ब्लो पाईप (प्लास्टिक पाईप) हे कोरोना संसर्गाचा विचार करून एका व्यक्तीसाठी एक पाईप (युज अ‍ॅन्ड थ्रो) वापरण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडुन साथीच्या रोगापासुन बचाव करण्याची यौगय दक्षता घेण्यात येत आहे. (Pune New Year)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नागरिकांनी दारू पिल्यानंतर वाहने चालवु नये असे आवाहन पोलिसांकडून (Pune Police) करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Traffic Police | Tomorrow (31 Dec 2022) traffic changes in Pune Camp (Lashkar) area; Ferguson Road and MG Road No-Vehicle Zone for 10 hours

 

हे देखील वाचा :

Pune Traffic Police | 1 जानेवारीला नववर्षानिमित्त दगडूशेठ गणपती येथे दर्शनासाठी येणार्‍या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीत बदल

Gautami Patil | सोलापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी; प्रेक्षकांनी देखील धरला ठेका

Pune Crime News | ‘भाई म्हणविणार्‍याने केला गोळीबार’ ! वानवडीतील महंमदवाडीतील जिल्हा प्रमुख शिव अल्पसंख्याक सेना कार्यालयातील घटना

 

The post Pune Traffic Police | उद्या (दि. 31 डिसेंबर) पुणे कॅम्प (लष्कर) परिसरातील वाहतूकीत बदल; फर्ग्युसन रोड आणि एमजी रस्ता 10 तासांसाठी नो-व्हेईकल झोन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article