Header

Pune Crime | कात्रज परिसरात महिलेसह तरुणाची एकाच घरात गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

Pune Crime | कात्रज परिसरात महिलेसह तरुणाची एकाच घरात गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | कात्रज भागात एका महिलेसह तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. बरखा मंडल (वय ३२) आणि राजू फारुख शेख (वय ३१, रा. सीताश्री निवास, संतोषनगर, कात्रज) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाड्याने कात्रज येथे खोली घेतली होती. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरखा ही मुळची पश्चिम बंगालची आहे.
तर, राजू हा पुण्यातील राहणारा आहे. बरखा हिची मुले व पती पश्चिम बंगालमध्ये असतात.
बुधवार पेठेतील कुंठणखान्यात बरखा आणि राजू यांची ओळख झाली.
त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते कात्रज येथे भाड्याने खोली घेऊन रहात होते.
दिवसभर त्यांचा दरवाजा उघडला न गेल्याने बाजूला राहणार्‍यांना शंका आली़ त्यांनी पोलिसांना याची माहिती कळविली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे (Bharti Vidyapeeth Police Station) पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी दरवाजा उघडून पाहणी केली. त्यात राजू याने हॉलमध्ये तर बरखा हिने किचनमध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | In Katraj area, a woman and a young man committed suicide by hanging themselves in the same house, a lot of excitement

 

हे देखील वाचा :

Amruta Subhash | अमृता सुभाषने बॉलिवूडमधील टाइपकास्ट वर केलेले ‘ते’ वक्त्यव्य चर्चेत; “ओटीटीमुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या…”

Subramanian Swamy | ‘… तर देवेंद्र फडणवीसांची खूर्ची जाईल’; पंढरपूर कॉरिडॉरवरून सुब्रम्हण्यम स्वामींचा इशारा

Sanjay Gaikwad | ‘50 खोक्यांची चौकशी करा’ या राऊतांच्या मागणीला संजय गायकवाड यांचे प्रत्युत्तर

Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार

 

The post Pune Crime | कात्रज परिसरात महिलेसह तरुणाची एकाच घरात गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article