Header

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | लग्नास नकार दिल्याने तरुणीवर वार करुन स्वत: आत्महत्या (Suicide In Pune) करण्याचा प्रकार पाषाणमध्ये घडला असतानाच युवतीच्या तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची (Acid Attack On Girl) धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मित्रमैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करीत असलेल्या १६ वर्षाच्या युवतीला लग्नाची मागणी घालून “तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही” असे बोलून तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका १६ वर्षाच्या युवतीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५४४/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमोल नवगीरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पाषाण येथील शिवनगरमधील राऊंड द क्लॉक कॅफेमध्ये (Round The Clock Cravings Pune) सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे.
त्या हॉटेलमध्ये मैत्रिणीसह वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अमोल हा मित्रांसह तेथे आला.
त्याने फिर्यादीचा हात धरुन हॉटेलच्या बाहेर चल तुझ्याशी बोलायचे असून तिला बाहेर ओढून फिर्यादीच्या
मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी या हात झटकून बाहेर आल्यावर त्याने फिर्यादीस माझ्याशी लग्न कऱ तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही तसेच तोंडावर अ‍ॅसीड फेकेल, अशी धमकी दिली. या प्रकाराने घाबरुन तिने पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक चाळके तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | ‘If you are not mine, I will not let you be anyone’s’! Threatened the girl and threatened to throw acid on her face

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गुंडांच्या टोळक्याने युवकावर कोयत्याने वार करुन घरावर केली दगडफेक, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR

Shilpa Shetty | विचित्र जीन्समुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल; ‘उर्फी जावेदकडे तुझे कपडे…’

Sanjay Raut | ‘महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल’ – संजय राऊत

Shambhuraj Desai | महापरिनिर्वाण दिनाला गालबोट लागू नये याकरिता दौरा पुढे ढकलला; शंभूराज देसाई

 

The post Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article