Header

Pune Haveli Tahsildar Trupti Kolte Suspended | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित; हडपसर जमीन प्रकरण व कोरोना काळातील खरेदी भोवली?

Pune Haveli Tahsildar Trupti Kolte Suspended | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित; हडपसर जमीन प्रकरण व कोरोना काळातील खरेदी भोवली?

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Haveli Tahsildar Trupti Kolte Suspended | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते (Tahsildar Trupti Kolte) यांना निलंबित करण्यात आले आहे. हडपसर येथील सर्व्हे नं. ६२ ही राखीव वन या संवर्गातील जमीन (Hadapsar Land Matter) अनाधिकाराने अर्जदाराला प्रदान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तत्कालीन महसूलमंत्री यांच्या आदेशाची खातरजमा न करता तसेच शासनाची पूर्व परवानगी न घेता व पुणे जिल्हाधिकारी (Pune Collector) यांची आवश्यक असणारे मार्गदर्शन, अभिप्राय किंवा आदेश प्राप्त न करता कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन अर्जदारास १२ जुलै २०२१ रोजी ही जमीन नावावर करुन दिली होती. शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांनी हा आदेश दिला आहे. (Pune Haveli Tahsildar Trupti Kolte Suspended)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

विभागीय आयुक्त यांच्याकडे २३ मे २०२२ ला सादर करण्यात आलेल्या अहवालावरून तहसीलदार तृप्ती कोलते यांनी कोरोना काळात जिवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना व आवश्यक सेवासुविधा प्राप्त करून घेताना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या १ डिसेबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार विहीत कार्यपध्दतीचा अवलंब न करता वित्तीय अनियमितता केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, २ जून २०२२ च्या पत्रान्वये विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालावरून तहसीलदार तथा व्यवस्थापकीय अधिकारी तृप्ती कोलते यांनी प्रकाश व इतर यांच्या प्रकरणात नियमबाह्य पध्दतीने कामकाज केले असल्याचे दिसून आले आहे. या शिवाय श्रीमती कोलते यांच्याविरुद्ध निवडणूकविषयक कामकाजाच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारी या गंभीर स्वरुपाच्या असल्याचे निदर्शनास आलेले आहे. कोलते यांनी कामात केलेल्या अनियमितता या गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे कोलते यांना शासन सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune Haveli Tahsildar Trupti Kolte Suspended)

 

त्याअनुषंगाने तहसीलदार कोलते यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७९ च्या नियम ४ (१) (अ) मधील तरतुदीनुसार या आदेशान्वये निलंबित करण्यात येत आहे.

 

Web Title :  Pune Haveli Tahsildar Trupti Kolte Suspended

 

हे देखील वाचा :

Amol Mitkari | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रया; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांनी मंत्रिपदासाठी भीक…’

Bhagat Singh Koshyari | मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Pune News | ‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच!; भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Shinde Group MLA Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब ठाकरे असतानासुद्धा शिवसेनेला 100 जागा मिळाल्या नाहीत, त्यामुळे… ‘ – आमदार संजय गायकवाड

 

The post Pune Haveli Tahsildar Trupti Kolte Suspended | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित; हडपसर जमीन प्रकरण व कोरोना काळातील खरेदी भोवली? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article