Header

Punit Balan | पुनीत बालन यांची नवीन चित्रपटाची घोषणा; नाव ‘रानटी’, पण ‘रानटी’ कोण हे मात्र गुलदस्त्यात

Punit Balan | पुनीत बालन यांची नवीन चित्रपटाची घोषणा; नाव ‘रानटी’, पण ‘रानटी’ कोण हे मात्र गुलदस्त्यात

पुणे : बहुजननामा ऑनलाईन –  निर्माते आणि युवा उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांनी सोशल मीडियावर क्लॅपचा फोटो शेअर करीत आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘रानटी’ असे या चित्रपटाचे नाव असून समित कक्कड हे त्याचे दिग्दर्शन करत आहेत. (Punit Balan)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मुळशी पॅटर्न या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर पुनीत बालन (Punit Balan) स्टुडिओजच्या माध्यमातून पुनीत बालन यांनी केलेल्या गुड शॉट, द हिंदू बॉय ह्या प्रामुख्याने काश्मीरमधील वास्तव्यावर बोट ठेवण्याऱ्या शॉट फ्लिमला जोरदार प्रतिसाद मिळाला. तसेच आशेची रोषणाई, पुनरागमनायच या शॉट फ्लिम आणि प्रामुख्याने काश्मिरी कलावंताचा सहभाग असलेल्या ‘अमन का आशियाना’ हा अल्बमला सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांचा ‘जग्गु आणि ज्युलिएट’ हा मराठी चित्रपट नवीन वर्षात रिलीज होणार आहे. या सर्व चित्रपट आणि शॉर्टफ्लिमच्या मालिकेत आता पुनीत बालन यांनी ‘रानटी’ नवा चित्रपट हाती घेतला आहे.

 

 

‘रानटी’ या टायटलसोबत दिलेली ‘काही असतात, काही बनतात’ ही टॅग लाइन रसिकांची उत्सुकता वाढवणारी आहे. बालन यांनी ‘रानटी’चा क्लॅप बोर्ड शेअर केला असला तरी यात नक्की ‘रानटी’ कोण बनलं आहे हे सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. लवकरच त्यावरूनही पडदा उठेल. पण तोपर्यंत तरी रसिक प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाणार आहे.

 

विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिगदर्शन करीत असलेल्या समित कक्कड यांनी मराठी सोबतच
हिंदीतही दर्जेदार चित्रपट आणि वेब सिरीज बनविल्या आहेत.
36 गुण या वेगळ्या वाटेवरच्या मराठी लव्ह स्टोरीनंतर क्राईम विश्वासावर फोकस टाकणारी त्यांची ‘धारावी बॅंक’
ही वेब सिरीज डिझिटल विश्वात चांगलीच लोकप्रिय ठरली. धारावी बॅंकनंतर आता कक्कड काय करणार
याची उत्सुकता होती. मात्र, त्यानेही ‘रानटी’चा क्लॅप बोर्ड शेअर करीत आगामी चित्रपटाची दिशा स्पष्ट केली आहे.
या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी एस. श्रीराम करत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Punit Balan | puneet balan announcement new movie ranati also share claps photo on social media

 

हे देखील वाचा :

Pune Crime | प्रसिद्ध सराफी पेढीच्या संचालकाच्या नावाने स्टेट बँकेला सायबर चोरट्यांनी घातला 19 लाखांना गंडा

Filmfare Awards | शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त

Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकरच्या क्लासिक लुकने इंस्टाग्रामवर लावली ‘आग’

 

The post Punit Balan | पुनीत बालन यांची नवीन चित्रपटाची घोषणा; नाव ‘रानटी’, पण ‘रानटी’ कोण हे मात्र गुलदस्त्यात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article